शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री दीक्षांत समारंभाचे मुख्य अतिथी

By admin | Updated: January 21, 2015 00:23 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून कुणाला बोलविण्यात येणार

नागपूर विद्यापीठ : सी.एन.आर.राव, कैलाश सत्यार्थींच्या नावाचा विचार नाहीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून कुणाला बोलविण्यात येणार याबाबत विद्यापीठ वर्तुळात उत्सुकता होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम झाले असून त्यांनीदेखील याकरिता होकार दिला आहे. दरम्यान सुप्रसिद्ध वैज्ञानिक व भारतरत्न पुरस्कारप्राप्त सी.एन.आर.राव किंवा नोबेल शांती पुरस्कार विजेते समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांना अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले व राज्यपाल कार्यालयाकडून या तारखेला मंजुरी देण्यात आली. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मुख्य अतिथी म्हणून कुणाला आमंत्रित करायचे यासंदर्भात चर्चा झाली. या समारंभाला शैक्षणिक व्यक्तीच मुख्य अतिथी म्हणून बोलविण्यात यावी, असा सदस्यांचा सूर दिसून आला. यावेळी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील निरनिराळ्या व्यक्तींची नावे सदस्यांकडून सुचविण्यात आली. यात भारतरत्न सी.एन.आर.राव तसेच कैलाश सत्यार्थी यांच्या नावांवर भर देण्यात आला.या दोघाही मान्यवरांना संपर्क करून निमंत्रण देण्यासंदर्भात विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होकार देण्यात आला. त्यामुळे त्यांच्याच नावावर अधिकाऱ्यांचे एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुख्यमंत्र्यांना इतका वेळ देणे शक्य होईल की नाही ही बाब लक्षात घेता शिक्षक किंवा सामाजिक क्षेत्रातील नामांकित व्यक्तीला निमंत्रित करण्याचा विचार होता. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी वेळ देण्याचे मान्य केल्यामुळे इतर नावांचा विचार न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)मुख्यमंत्री देणार अडीच तास साधारणत: दीक्षांत समारंभ हा अडीच ते तीन तास चालतो. मुख्यमंत्र्यांचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता त्यांना इतका वेळ देणे शक्य होईल की नाही हा विद्यापीठातील अधिकाऱ्यांना प्रश्न पडला होता. परंतु मुख्यमंत्री विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला थोडेथोडके नव्हे तर अडीच तास उपस्थित राहणार आहेत.