शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू शेती वाचविण्यासाठी परिवर्तन मोहीम राबवा

By admin | Updated: January 20, 2015 02:00 IST

पावसाने ओढ दिल्यास कोरडवाहू शेतीतील पिके वाचविण्यासाठी संरक्षित सिंचन (प्रोटेक्टिव्ह इरिगेशन) हाच चांगला पर्याय आहे.

प्रतिभाताई पाटील : ‘लोकमत’च्या ‘आयकॉन्स आॅफ खान्देश’ कॉफीटेबल बुकचे थाटात प्रकाशनजळगाव : पावसाने ओढ दिल्यास कोरडवाहू शेतीतील पिके वाचविण्यासाठी संरक्षित सिंचन (प्रोटेक्टिव्ह इरिगेशन) हाच चांगला पर्याय आहे. त्यासाठी उत्तरेतील नद्यांमधील वाया जाणारे पाणीदेखील वाहून आणण्याची गरज आहे. कोरडवाहू शेतकऱ्याला वाचविण्यासाठी परिवर्तनाची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.‘लोकमत’ निर्मित ‘आयकॉन्स आॅफ खान्देश’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी खान्देशातील ३७ आयकॉन्सचा सत्कार केला. प्रतिभाताई म्हणाल्या, की कोरडवाहू शेतकरीच प्रामुख्याने आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे. राष्ट्रपतीपदी असताना मी त्यासाठी राज्यपालांची समिती नेमली होती. शिवराज पाटील समितीचे अध्यक्ष होते. समितीने कोरडवाहू शेतीच्या समस्या व शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी शिफारशी मागविल्या. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी समितीचा अहवाल अंमलबजावणीसाठी नियोजन आयोगाकडे पाठविला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सुचविले. (प्रतिनिधी)सिंचनाचा अनुशेष भरावा -खा. दर्डाविदर्भ व खान्देशचा सिंचनाचा अनुशेष जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे भरून काढतील. महाजन यांचे सर्वच पक्षांत मित्र आहेत. त्यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी इतर पक्षांतील त्यांचे मित्र प्रार्थना करीत होते, असे लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा खासदार विजय दर्डा यांनी सांगताच सभागृहात खसखस पिकली. ‘आयकॉन्स’च्या माध्यमातून प्रेरणादायी काम करणाऱ्या मंडळींचे कार्य जगासमोर येत आहे. ‘आयकॉन्स’ची सुरुवात मुंबईपासून झाली. औरंगाबाद, पुणे, नागपुरात कार्यक्रम झाले आहेत. देशभरातील उद्योजक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींची उपस्थिती त्यासाठी लाभली, असेही ते म्हणाले. ‘लोकमत’चे कौतुक‘लोकमत’च्या उपक्रमाचे प्रतिभातार्इंनी कौतुक केले. त्या म्हणाल्या, की ‘लोकमत’च्या प्रगतीचा आलेख सातत्याने चढता आहे. टीव्ही, मनोरंजन क्षेत्रातील या समूहाचे पाऊलही यशस्वी झाले आहे.