शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे परराष्ट्र धोरण चुकीचे- सुशीलकुमार शिंदे

By admin | Updated: September 25, 2016 22:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त बलुचिस्तानचा मुद्दा काढून पाकिस्तानला उचकवण्याचे काम केले.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त बलुचिस्तानचा मुद्दा काढून पाकिस्तानला उचकवण्याचे काम केले. केंद्र सरकारच्या चुकीच्या परराष्ट्रीय धोरणामुळे तसेच इंटेलिजन्स, मिलिटरी, पोलीस या यंत्रणांमधील असमन्वयामुळेच काश्मीरमधील उरी येथे आत्मघाती हल्ला झाल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यातील मराठा मोर्चाचे अभिनंदन करून त्यांना आरक्षण देणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.नाशिकमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, पठाणकोट हल्ल्यानंतर हा देशावरील शेवटचा हल्ला आहे, असे केंद्रातर्फे सांगितले गेले होते. यानंतर एका सैनिकांचे शिर कापून नेल्याच्या घटनेनंतर एक के बदले हम दस शिर लाऐंगे, अशीही घोषणा करण्यात आली होती. भारताची गुप्तचर यंत्रणा सक्षम असतानाही उरीतील सैन्य दलाच्या मुख्यालयावर हल्ला होतो व १७ सैनिकांना आपले प्राण गमवावे लागतात, याचा अर्थ गुप्तचर यंत्रणा, सैन्यदल, पोलीस, एजन्सी यांच्यामध्ये समन्वय नाही. सद्यस्थितीत सुरू असलेली युद्धाची भाषा ही देशाला न परवडण्यासारखी आहे. १९६५, १९७१ व अगदी अलीकडेच कारगिल युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडल्याचे शिंदे यांनी सांगितले.मराठा समाजाला आरक्षण देणे शक्यराज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या मराठा समाज आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढतो आहे. मराठा समाज आरक्षणाचा मुद्दयावर एकत्र झाला ही अभिनंदनाची बाब असून, विशेष म्हणजे हे मोर्चे अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने निघत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या बदलाबाबत बोलताना हा केंद्र सरकारचा कायदा असून त्याचा गैरवापर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे ते म्हणाले.