शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्करुग्णांना मिळणार मोफत आॅनलाइन सल्ला

By admin | Updated: June 10, 2015 04:20 IST

टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर गोरगरीब रुग्णांना आॅनलाइन मोफत सेकंड ओपीनियन देणार आहेत.

मुंबई : कर्करोगाच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च होतात. शस्त्रक्रिया करावी की नाही, कोणत्या पद्धतीने उपचार घ्यावेत, याविषयी सेकंड ओपीनियन घेण्यासाठी अनेक रुग्ण परळच्या टाटा रुग्णालयात येतात. पण यापुढे रुग्णांना रुग्णालयात येऊन सेकंड ओपीनियन घ्यायची आवश्यकता नाही. कारण टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर गोरगरीब रुग्णांना आॅनलाइन मोफत सेकंड ओपीनियन देणार आहेत.भारतात मुखाच्या आणि स्तनाच्या कर्करुग्णांचे प्रमाण जास्त आहे. उपचार घेताना कर्करुग्णांना शारीरिक त्रास होतात. यामुळे अनेक जण एका ठिकाणी उपचार घेत असताना दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतात, पण हा सल्ला घेण्यासाठी त्यांना पैसे खर्च करून लांब प्रवास करीत यावे लागते. यामुळे रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाइकांना त्रास होतो. टाटा रुग्णालय हे कर्करोग उपचारासाठी टर्शरी केअर सेंटर म्हणून ओळख आहे. यामुळे येथे अनेक ठिकाणाहून रुग्ण येत असतात. रुग्णांना त्यांच्या घराजवळच उपचार मिळावेत, अशी आमची इच्छा आहे. पण काही वेळा रुग्णांच्या घराजवळ चांगले उपचार अथवा तज्ज्ञ डॉक्टर नसतात. यामुळे त्यांना शहराकडे यावे लागते. रुग्णांचा त्रास कमी व्हावा आणि रुग्णालयाचा भार कमी व्हावा, यासाठीच आॅनलाइन सल्ला देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. प्राथमिक पातळीवर स्तनाच्या कर्करोगाचा सल्ला देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले. कर्करोग रुग्णांसाठी ही सेवा टाटा रुग्णालय आणि नाव्या नेटवर्क संयुक्त विद्यमाने देत आहेत. संकेतस्थळावर रुग्णाची संपूर्ण माहिती आणि आजाराविषयीची माहिती भरायची आहे. त्याचबरोबरीने इतर सर्व कागदपत्रे भरायची आहेत. (प्रतिनिधी)