कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीए परीक्षा पुढे ढकलली 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 06:22 PM2020-03-28T18:22:11+5:302020-03-28T18:25:45+5:30

येत्या मे महिन्यात होणारी 'सीए' परीक्षा आता जून-जुलै महिन्यात होणार

The CA exam was postponed because of Corona's background | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीए परीक्षा पुढे ढकलली 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीए परीक्षा पुढे ढकलली 

Next
ठळक मुद्दे'आयसीएआय'तर्फे मे महिन्यात परीक्षांचे आयोजन कोरोनाच्या संसर्गामुळे देशात भीतीचे वातावरण

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सनदी लेखापाल (सीए) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या मे महिन्यात होणारी 'सीए' परीक्षा आता जून-जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) परिपत्रक स्पष्ट केली आहे.

'आयसीएआय'तर्फे मे महिन्यात परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. तसेच सरकारने देशभरात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे सीए परीक्षा लांबणीवर पडली आहे. येत्या २ मे ते १८ मे या कालावधीत होणाऱ्या फौंडेशन कोर्स (नवीन अभ्यासक्रम), इंटरमीजीएट कोर्स (नवा व जुना अभ्यासक्रम), फायनल कोर्स (जुना व नवा अभ्यासक्रम), इंटरनॅशनल ट्रेड लॉ अँड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल टॅक्सेशन या सर्व परीक्षा आता २० जून ते ३ जुलै २०२० या कालावधीत होणार आहेत. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी 'आयसीएआय'चे संकेतस्थळ पाहावे किंवा पुणे शाखेशी संपर्क साधावा,असे आवाहन 'आयसीएआय' पुणेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी केले आहे.

Web Title: The CA exam was postponed because of Corona's background

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.