शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपानं हातात बांगड्या भरलेल्या नाहीत - फडणवीसांचं शिवसेनेच्या अरे ला का रे

By admin | Updated: October 30, 2015 17:07 IST

शिवसेनेची संस्कृती गुंडगिरीची राहिलेली असल्याचे सांगत आम्हीही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असे उद्गार देवेंद्र फडणवीसांनी कल्याणमध्ये कार्यकर्ता सभेत काढले.

ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. ३० - शिवसेनेची संस्कृती गुंडगिरीची राहिलेली असल्याचे सांगत आम्हीही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांत असल्याचे उद्गार देवेंद्र फडणवीसांनी कल्याणमध्ये कार्यकर्ता सभेत काढले.
राज ठाकरे, उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करताना आमची बुलेटची संस्कृती नाहीये बॅलटची असल्याचं फडणवीस म्हणाले. 
 
फडणवीसांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे:
 
- ज्यावेळी इंदिरा गांधीनी आणिबाणी लादली नाही त्यावेळी जनसंघाचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक जेलमध्ये होते, माझे वडील दोन वर्ष जेलमध्ये होते, त्यावेळी तुम्ही कुठे होतात असा प्रश्न शिवसेनेला फडणवीसांनी विचारला.
- दाऊदचा नातेवाईक असलेल्या मियाँदादला जेवायला घालताना राष्ट्रवाद कुठे गेला होता, तो गुलाम अलींच्यावेळी का उफाळून आला, ते ही निवडणुकांच्या वेळीच.
- वाघाचा पंजा आम्हाला नाही दाखवायचा, तो काँग्रेसला राष्ट्रवादीला दाखवा. आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालणारी माणसं आहोत.
- आम्ही केलेल्या कामांचं प्रेझेंटेशन राज ठाकरे करताहेत, ते कार्टून काढायचे माहीत होतं, उद्धव ठाकरे फोटो काढायचे आता राज ठाकरे आमच्या कामाचे फोटो काढून स्वत:ची कामं म्हणून दाखवतात.
- नाशिकचा कायापालट राज्य सरकारने केला आणि हे आम्हीच नाही तर अमेरिकेच्या संस्थेनी मान्य केलं आणि तिकडे बोलावून सत्कार केला. विक्रमी वेळेत आम्ही घाट बांधले, रस्ते बांधले.
- नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी खर्च करण्यासाठी महापालिकेकडे छदाम नव्हता, राज्य सरकारने २,५०० कोटी रुपये खर्च केले, परंतु राज ठाकरे आमच्या कामांचं प्रदर्शन स्वत:ची कामं म्हणून करत आहेत.
- नाशिकचा तुम्ही विकास केलात हे खरं असेल, तर तुमचा एकही आमदार का निवडून आला नाही.
- पंधरा वर्षात कल्याण डोंबिवलीच्या केलेल्या सत्यानाशाची जबाबदारी शिवसेनेचीच आहे.
- शिवसेनेनं भाजपाच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, एकाला तर पळवलं व बेदम मारहाण केली. अटक टाळण्यासाठी आता ते उलटा कांगावा करताहेत. आपण बांगड्या भरलेल्या नाहीयेत, पण भाजपा कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा.
- एकनाथ शिंदेंनी राजीनाम्याचं नाटक केलंय, शिवसेना ही नाटक कंपनी.