शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्य़ात कडकडीत बंद

By admin | Updated: June 8, 2014 23:44 IST

आरक्षणाच्या मुद्यावर आक्षेपार्ह लिखाण करून फेसबुकवर अपलोड केल्याच्या निषेधार्थ बुलडाणा शहरात अघोषित बंद

बुलडाणा : आरक्षणाच्या मुद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून फेसबुकवर अपलोड केल्याच्या निषेधार्थ रविवारी बुलडाणा शहरात अघोषित बंद पाळण्यात आला. बंददरम्यान परिवहन महामंडळाच्या बसेसची तोडफोड केल्याच्या तीन घटना घडल्या. परिणामी दुपारी ४ वाजेपर्यंत एसटी महामंडळाच्या बसेसही बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असून, राज्य परिवहन महामंडळाचेही मोठे नुकसान झाले. फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराची माहिती बुलडाण्यात पोहोचताच, दलित वस्त्यांमधील ४00 ते ५00 नागरिकांचा जमाव शहर पोलीस ठाण्यावर धडकला. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जमावाने प्रचंड नारेबाजीही केली. त्यामुळे काही काळ पोलीस स्टेशनच्या आवारात तणावपूर्ण शांतता होती. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी लगेच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.काही ठिकाणी तोडफोडीच्या घटनाही घडल्या. अज्ञात आरोपींनी बाजार लाईनमधील एका दुकानाची तोडफोड केली. शनिवारी रात्री बसच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर रविवारी सकाळी आणखी दोन बसेसची तोडफोड करण्यात आली. खबरदारीचा म्हणून परिवहन महामंडळाने सकाळी ८ वाजतापासूनच बसेस बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावरच ताटकळत बसावे लागले होते. या अघोषित बंदचा परिणाम आठवडी बाजारावरही झाला आहे. काही तालुक्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लिपीक टंकलेखक पदाची भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पोलिसांनी काही फेसबुकवर आक्षेपार्ह मजकुर अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे; मात्र या युवकाच्या नावे असलेले फेसबुक अकाऊंट बनावट असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.