राज्यसभेच्या ४ जागांसाठी भाजपकडून २५ नावे; तावडे, दानवे, कांबळेंसह यादीत कोणाची नावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 05:54 IST2026-02-26T05:51:17+5:302026-02-26T05:54:16+5:30

मित्रपक्षाच्या नेत्याच्या नावाची शिफारस करणे हा विषय प्रदेश कोअर कमिटीच्या अखत्यारित येत नसल्याने याबाबतचा निर्णय केंद्रीय भाजपच घेईल.

BJP names 25 names for 4 Rajya Sabha seats; Whose names are in the list along with Tawde, Danve, Kamble? | राज्यसभेच्या ४ जागांसाठी भाजपकडून २५ नावे; तावडे, दानवे, कांबळेंसह यादीत कोणाची नावे?

राज्यसभेच्या ४ जागांसाठी भाजपकडून २५ नावे; तावडे, दानवे, कांबळेंसह यादीत कोणाची नावे?

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीने संभाव्य २५ नावांची एक यादी केंद्रीय भाजपकडे पाठविण्याचा निर्णय मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला.

यामध्ये भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, माजी आमदार कुणाल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी राज्यमंत्री दिलिप कांबळे, भाजपचे नेते माधव भंडारी, माजी खासदार अमर साबळे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार प्रीतम मुंडे, पुसदच्या डॉ. संगीता फुसाटे आदींचा समावेश आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत असल्याने भाजपच्या वाट्याला येणार्या चारपैकी एक जागा त्यांना दिली जाईल असे मानले जात आहे. मात्र, मित्रपक्षाच्या नेत्याच्या नावाची शिफारस करणे हा विषय प्रदेश कोअर कमिटीच्या अखत्यारित येत नसल्याने याबाबतचा निर्णय केंद्रीय भाजपच घेईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, आशिष शेलार, अमित साटम हे कोअर कमिटी बैठकीस उपस्थित होते.

Web Title : भाजपा ने राज्यसभा के लिए तावड़े, दानवे समेत 25 नाम प्रस्तावित किए।

Web Summary : भाजपा की कोर कमेटी ने राज्यसभा सीटों के लिए केंद्रीय नेतृत्व को 25 नाम सुझाए। विनोद तावड़े, रावसाहेब दानवे और मिलिंद कांबले जैसे प्रमुख नाम सूची में हैं। रामदास अठावले को सीट मिलने की संभावना है।

Web Title : BJP proposes 25 names for Rajya Sabha, including Tawde and Danve.

Web Summary : BJP's core committee suggests 25 names to central leadership for Rajya Sabha seats. Key figures like Vinod Tawde, Raosaheb Danve, and Milind Kamble are on the list. Ramdas Athawale is likely to get a seat.