शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातल्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करुन दाखवलं- उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 19:20 IST

उदयनराजे भोसले यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल

सातारा: विरोधी पक्षाचा खासदार असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम मला मदत केली. अनेक प्रकल्प मार्गी लावले. फडणवीसांना जे जमलं, ते साताऱ्यातल्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या उदयनराजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केलं. भाजपा प्रवेशानंतर उदयनराजे यांनी पहिल्यांदाच साताऱ्यात भाषण केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करत काँग्रेस, राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात आली. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी भाषण केलं. उदयनराजे यांनी त्यांच्या भाषणातून काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. 'मी तुकड्यावर जगतो, असं कोणी म्हणू नये. उलट असं म्हणणाऱ्यांनी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची अवस्था तुकड्यातुकड्यासारखी का झाली आहे, याचा विचार करावा. पक्षाच्या अवस्थेबद्दल आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करण्याची वेळ आली नसती,' असा टोला उदयनराजेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीला लगावला. आधी सत्तेत असतानादेखील जनतेची कामं व्हायची नाहीत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मी राष्ट्रवादीचा खासदार असतानाही अनेक प्रकल्प मार्गी लावले. आधी सत्ता असूनही जनतेच्या कामांसाठी भांडावं लागायचं. मला साताऱ्यात आयआयएम, आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्था आणायच्या होत्या. मात्र त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी राज्यात जागा नसल्याचं कारण दिलं, अशा शब्दांमध्ये उदयनराजेंनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलो, तेव्हा माझं मताधिक्य वाढलं होतं. मात्र यंदा माझं मताधिक्य कमी झालं. याबद्दलचा विचार करुन मी आत्मचिंतन केलं आणि त्यानंतर काम करणाऱ्या सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं उदयनराजे म्हणाले. आधीची माणसं कामाला लावणारी होती. मात्र आता मंचावर असलेली माणसं कामं मार्गी लावणारी आहेत. त्यामुळे आता लोकांनीदेखील कामाला लावणारी आणि कामं मार्गी लावणारी माणसं ओळखावी, असं आवाहन त्यांनी केलं. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस