शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मराठा आरक्षण टिकविता येत नसेल, तर किमान दिशाभूल करू नका: प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 11:23 AM

मराठा आरक्षणावर (maratha reservation) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आता यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे.

ठळक मुद्देप्रवीण दरेकर यांची महाविकास आघाडी सरकारवर टीकामराठा आरक्षणावरून जनतेची दिशाभूल करू नये - प्रवीण दरेकरअशोक चव्हाण यांनी त्यांचा अभ्यास किती कच्चा आहे, हे दाखवून दिले - प्रवीण दरेकर

मुंबई :मराठा आरक्षणावर (maratha reservation) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आता यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते केंद्रावर याचे खापर फोडत असताना विरोधी भारतीय जनता पक्ष (BJP) सरकारवर टीका करताना दिसत आहे. यातच राज्यातील महाविकास आघाडीला मराठा आरक्षण टिकविता येत नसेल तर तसे त्यांनी स्पष्टपणे सांगावे. जनतेची आणि मराठा समाजाची दिशाभूल करू नये, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. (bjp leader pravin darekar slams maha vikas aghadi govt over maratha reservation)

प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, मुळात मराठा आरक्षणासंदर्भातील महाराष्ट्राचा कायदा हा १०२ व्या घटनादुरूस्तीच्या आधीचा आहे. एसईबीसी कायदा नोव्हेंबर २०१८ मध्ये लागू केल्याचे सांगून अशोक चव्हाण यांनी त्यांचा अभ्यास किती कच्चा आहे, हेच दाखवून दिले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये या कायद्यात केवळ दुरूस्ती करण्यात आली. आणखी महत्त्वाचे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने जेव्हा मराठा आरक्षणाचा राज्याचा कायदा वैध ठरविला, तेव्हा त्यात याचा स्पष्टपणे उल्लेख केला. १०२ वी घटनादुरूस्ती या कायद्याला लागू होणार नाही, असे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे बळ असताना आता राज्य सरकार स्वत:हून १०२ व्या घटनादुरूस्तीचा विषय का उपस्थित करू पाहत आहेत, हे अनाकलनीय आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. 

अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणाचं काहीही देणं-घेणं नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका

केंद्राचे महाधिवक्ता यांना या प्रकरणात नोटीस ही केवळ ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या संदर्भात आहे. त्यामुळे त्यांनी केवळ त्याविषयापुरती बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयात या घटनादुरूस्तीचा विषय राज्याच्या वतीने उपस्थित करण्यात आला, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून स्पष्टपणे दिसून येते, असे दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाच्या प्रकरणाबद्दल काही घेणं-देणं नाही. या प्रकरणाचे काही होवो. त्यांना केवळ केंद्र सरकारवर टीका करायची आहे. केंद्र सरकारला जबाबदार धरायचे आहे. तो अजेंडा धरूनच ते बोलत आहेत. राज्याने संदिग्ध भूमिका मांडायची आणि केंद्र सरकारवर खापर फोडायचे. अशोक चव्हाण यांना नेमके काय करायचे आहे, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणpravin darekarप्रवीण दरेकरAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट