आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 08:53 PM2021-03-23T20:53:29+5:302021-03-23T20:57:29+5:30

Param Bir Singh Letter: नारायण राणे (narayan rane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते.

bjp leader narayan rane claimed that thackeray govt will be dismissed soon | आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा

आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा

Next
ठळक मुद्देनारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणाराष्ट्रपती राजवटीची मागणी पुन्हा संसदेत करणार - राणेराज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात - राणे

सिंधुदुर्ग :सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगणी करण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर व धक्कादायक आरोप केले आहे. यानंतर विद्यमान भाजप खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते. त्यानंतर आता नारायण राणे यांनी ठाकरे सरकारचे लवकरच विसर्जन होईल, असा दावा केला आहे. (bjp leader narayan rane claimed that thackeray govt will be dismissed soon)

नारायण राणे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध आणि लोकप्रिय उद्योपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटकं, सचिन वाझे यांची अटक, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप यांसारख्या मुद्द्यांवरून नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

राष्ट्रपती राजवटीची मागणी पुन्हा संसदेत करणार

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. ही मागणी मान्य होणार असून, आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार आहे, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी केला आहे. राष्ट्रपती राजवटीची मागणी पुन्हा संसदेत करणार आहे, असेही राणे म्हणाले.

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पोलीस खात्यात कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सचिन वाझे हे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत होते, असा दावा करत वाझेंकडे अनेक वेगवेगळ्या गाड्या आढळल्या असतील, तर त्याच्या बाकीच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हायला हवी. अशा माणसाला पाठीशी घातले जाऊ नये, असे नारायण राणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझेंना पाठीशी घातले

मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे संबध असल्याचे बाहेर आल्यावर मनसुखची हत्या करण्यात आली. सचिन वाझेंनी ही हत्या केल्याचा आरोप मनसुखच्या पत्नीने केला तरी मुख्यमंत्र्यांनी त्याला पाठीशी घातले, अशी टीका नारायण राणे यांनी केली. मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांना अटक होऊ नये, म्हणून मुख्यमंत्रीनी प्रयत्न केले, असा आरोपही राणे यांनी केला. 

रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा

मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप होऊनही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देशमुख यांना वाचवण्यासाठी त्यांची बाजू घेतली. मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. कोणी निंदा, कोणी वंदा भ्रष्टाचार करणे हाच आमचा धंदा, असाच एकंदर या सरकारचा कारभार या सगळ्यातून दिसतो, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.

Web Title: bjp leader narayan rane claimed that thackeray govt will be dismissed soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.