शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:32 IST

आम्ही या नाराज नगरसेवकांच्या संपर्कात आहोत. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत लवकरच या नाराज नगरसेवकांची बैठक घेणार असून ज्या अडचणी असतील त्या दूर केल्या जातील असं डाकी यांनी स्पष्ट केले. 

ठाणे - बऱ्याचदा इतर पक्षातील नेते, लोकप्रतिनिधी सत्ताधारी भाजपात प्रवेश करताना दिसतात परंतु मुरबाड नगरपंचायतीत घडलेल्या प्रकाराने भाजपासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही मोठा धक्का बसला आहे. मुरबाडमधील भाजपाच्या १० पैकी ९ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाला जिल्हाधिकारी कार्यालयानेही मान्यता दिली आहे. भाजपा नगरसेवकांच्या या खेळीमुळे नगरपंचायतीतील भाजपाचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्याविरोधात नगरसेवकांनी ही भूमिका घेतली आहे.

मुरबाडमध्ये मागे झालेल्या निवडणुकीत एकूण १७ नगरसेवकांपैकी १० भाजपाचे, शिवसेनेचे ५ आणि अन्य २ अपक्ष नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिला त्यामुळे या नगरपंचायतीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष भाजपाचे निवडून आले. परंतु अलीकडेच उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून भाजपातील मतभेद चव्हाट्यावर आले. उपनगराध्यक्षपदासाठी कथोरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकाचे नाव पुढे केले त्याला भाजपा नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. विशेष म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपा नगरसेवकांनी अपक्ष उमेदवाराला मतदान करत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला.

भाजपाच्या १० पैकी ९ नगरसेवकांनी मुरबाड परिवर्तन पॅनल असा स्वतंत्र गट स्थापन केला आहे २६ मे रोजी नगरसेवक मोहन गडगे यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जही करण्यात आला. त्याला गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आता भाजपाच्या गटात पक्षाचा १ आणि समर्थक २ नगरसेवक असतील. 

दरम्यान, मुरबाड मतदारसंघात किसन कथोरे हे भाजपाचे आमदार आहेत. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. मुरबाड नगरपंचायतीत अशाप्रकारे पक्षातील ९ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची पुष्टी भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी दिली. उपनगराध्यक्षपदाबाबत काही नगरसेवकांमध्ये नाराजी होती. आम्ही या नाराज नगरसेवकांच्या संपर्कात आहोत. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत लवकरच या नाराज नगरसेवकांची बैठक घेणार असून ज्या अडचणी असतील त्या दूर केल्या जातील असं डाकी यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस