अजित पवार विमान अपघात प्रकरणी मोठी अपडेट; तीन मृतदेह सापडले, अद्याप ओळख पटलेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:09 IST2026-01-28T10:08:29+5:302026-01-28T10:09:22+5:30

Ajit Pawar plane crash death news: अपघातग्रस्त विमानाजवळ तीन मृतदेह सापडले; अद्याप ओळख पटलेली नाही, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांची माहिती

Big update in Ajit Pawar plane crash death; Three bodies found, identities not yet confirmed | अजित पवार विमान अपघात प्रकरणी मोठी अपडेट; तीन मृतदेह सापडले, अद्याप ओळख पटलेली नाही

अजित पवार विमान अपघात प्रकरणी मोठी अपडेट; तीन मृतदेह सापडले, अद्याप ओळख पटलेली नाही

बारामती (पुणे): महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला भीषण अपघात झाला, ज्यात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते, जिथे त्यांच्या प्रचाराच्या चार महत्त्वाच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. सकाळी ८:४५ च्या सुमारास त्यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. लँडिंगवेळी तांत्रिक बिघाड झाल्याने विमान धावपट्टीजवळच्या शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळी विमानाचे मोठे अवशेष विखुरलेले असून आगीचे लोट दिसत होते. या भीषण अपघातात विमानातील ६ जणांचा (२ वैमानिक, अजित पवार, १ सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी) मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

राजकीय विश्वात मोठी पोकळी
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामतीचा विकास आणि राज्याच्या प्रशासनावर पकड असलेले 'दादा' म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर सर्व राजकीय सभा रद्द करण्यात आल्या असून, प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.

Web Title : अजित पवार विमान दुर्घटना: बड़ा अपडेट; तीन शव मिले, पहचान नहीं हुई

Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार की बारामती हवाई अड्डे के पास एक विमान दुर्घटना में कथित तौर पर मृत्यु हो गई। लैंडिंग के दौरान चार्टर्ड विमान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें पवार सहित सभी छह लोगों की मौत हो गई। तकनीकी खराबी का संदेह है। इस घटना से महाराष्ट्र में शोक की लहर है, जिसके कारण राजनीतिक कार्यक्रम रद्द कर दिए गए हैं।

Web Title : Ajit Pawar Plane Crash: Major Update; Three Bodies Found, Unidentified

Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar reportedly died in a plane crash near Baramati airport. The chartered plane crashed during landing, killing all six occupants, including Pawar. Technical failure is suspected. The incident has cast a pall of gloom over Maharashtra, prompting cancellation of political events.