Sharad Pawar Health Update: मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:43 IST2026-02-09T14:22:24+5:302026-02-09T14:43:16+5:30

Sharad Pawar Health Update: खोकल्याचा त्रास वाढल्याने शरद पवार बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिककडे रवाना. ताफ्यात सुप्रिया सुळे सोबत. वाचा ताज्या घडामोडी.

Big news! Sharad Pawar is suffering from cough, will be brought from Baramati to Ruby Hall Clinic in Pune for treatment | Sharad Pawar Health Update: मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले जाणार

Sharad Pawar Health Update: मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले जाणार

Sharad Pawar Hospitalised:राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकला आणण्यात येत आहे. सध्या त्यांचा ताफा वरवंडच्या जवळ असल्याचे समजते आहे. पुढील पाऊन तासात ते हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना अस्वस्थ वाटत होते. खोकल्याचा त्रास सुरु होता. आज बारामतीमध्ये असतानाच त्यांना त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या त्यांचा ताफा पुण्याच्या सीमेवर पोहोचला असून, रुग्णालयाने विशेष वैद्यकीय पथक तैनात ठेवले आहे. शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील असल्याचे समजते आहे.

रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचे की घरी सोडायचे यावर निर्णय घेतला जाणार आहे. आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉल चे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांची तपासणी करू, त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ."

रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त
शरद पवार रुग्णालयात दाखल होणार असल्याचे समजताच रुबी हॉल क्लिनिक परिसरात कार्यकर्ते दाखल होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. पवारांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती डॉक्टरांच्या तपासणीनंतरच समोर येईल.

Web Title : शरद पवार की तबीयत बिगड़ी, पुणे के रूबी हॉल क्लिनिक में भर्ती।

Web Summary : शरद पवार की बारामती में तबीयत बिगड़ी। उन्हें खांसी के कारण पुणे के रूबी हॉल क्लिनिक में इलाज के लिए ले जाया जा रहा है। मेडिकल टीम तैयार है।

Web Title : Sharad Pawar ill, rushed to Pune's Ruby Hall Clinic.

Web Summary : Sharad Pawar's health deteriorated in Baramati. He's being moved to Pune's Ruby Hall Clinic for treatment due to a cough. A medical team is ready.