ऐन ZP निवडणुकीत उद्धवसेनेला मोठा धक्का! माजी आमदारांचा जय महाराष्ट्र; भाजपात प्रवेशही झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 17:25 IST2026-01-26T17:24:33+5:302026-01-26T17:25:31+5:30

Shiv Sena Uddhav Thackeray Group: शिवसैनिकांची कामे होत नाहीत. नेतृत्वाचे या भागावर दुर्लक्ष झाले, अशी प्रतिक्रिया माजी आमदारांनी भाजपा प्रवेशावेळी दिली.

big blow to shiv sena uddhav thackeray group before maharashtra ZP elections 2026 former mla join BJP | ऐन ZP निवडणुकीत उद्धवसेनेला मोठा धक्का! माजी आमदारांचा जय महाराष्ट्र; भाजपात प्रवेशही झाला

ऐन ZP निवडणुकीत उद्धवसेनेला मोठा धक्का! माजी आमदारांचा जय महाराष्ट्र; भाजपात प्रवेशही झाला

Shiv Sena Uddhav Thackeray Group: नगर पालिका, नगर परिषदा, महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषेदच्या निवडणुका होत आहेत. नगर पालिका, परिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाने मोठे यश मिळवले. यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही हीच लय कायम ठेवण्यावर भाजपाचा भर असणार आहे. विधानसभा निवडणुकांपासून उद्धवसेनेत सुरू असलेली गळती अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धवसेनेच्या माजी आमदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकाही पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले. त्यानंतर आता १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. याच निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. औसाचे माजी आमदार दिनकरराव माने यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

ऐन ZP निवडणुकीत उद्धवसेनेला मोठा धक्का! माजी आमदारांचा जय महाराष्ट्र

औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकरराव माने, उपजिल्हाप्रमुख संतोष सूर्यवंशी, तालुका प्रमुख आबासाहेब पवार, तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी, माजी तालुका प्रमुख संजय उजळबे, तालुका समन्वयक प्रदीप रणखांब, उप तालुका समन्वयक महादेव साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. आमदार अभिमन्यू पवार, भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील-कव्हेकर, भाजपाचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, भाजपाचे मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे लातूरमध्ये ठाकरे गटाची ताकद कमी झाली असून भाजपाची ताकद आणखी वाढली आहे. 

दरम्यान, विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लातूर जिल्ह्यात शिवसेना सक्षमपणे उभी करण्याचे आणि जिवंत ठेवण्याचे काम आम्ही केले. आम्हाला लोकांनी भरभरून प्रेम दिले. आमदार केले. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने लातूर जिल्ह्यावर लक्ष दिले नाही. संघटनात्मक पातळीवर शिवसेना कमजोर होत गेली. शिवसैनिकांची कामे वेळेवर होत नाहीत. सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. महाराष्ट्राचे सक्षम नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांसठी काम करावे या अपेक्षेने भाजपात पक्षप्रवेश करत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title : उद्धव सेना को झटका: पूर्व विधायक ZP चुनाव से पहले भाजपा में शामिल

Web Summary : ZP चुनावों से पहले, उद्धव ठाकरे की शिवसेना को झटका लगा है क्योंकि औसा के पूर्व विधायक दिनकरराव माने प्रमुख समर्थकों के साथ भाजपा में शामिल हो गए। इस कदम से लातूर में ठाकरे समूह कमजोर हो गया, जिससे भाजपा की ताकत बढ़ गई।

Web Title : Uddhav Sena Suffers Setback: Former MLA Joins BJP Before ZP Election

Web Summary : Ahead of ZP elections, Uddhav Thackeray's Shiv Sena faces a blow as former Ausa MLA Dinkarrao Mane defects to BJP with key supporters. This move weakens Thackeray's group in Latur, boosting BJP's strength.