शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 13:04 IST

Padmakar Valvi Joins Congress: विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राज्यातील पक्षसंघटना उभी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने भाजपाला मोठा धक्का दिला आहे.  नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राज्यातील पक्षसंघटना उभी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसनेभाजपाला मोठा धक्का दिला आहे.  नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पद्माकर वळवी यांनी गतवर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र वर्षभरातच त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.

पद्माकर वळवी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी भेट घेऊन काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आदिवासी काँग्रेसचे प्रदेश महासचिव ॲड. रोशन गावित, धुळे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक अहिरे तसेच बुलढाणा शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस, इरफान पठाण व काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पद्माकर वळवी यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

“माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. लवकरच नंदूरबार येथे भव्य कार्यक्रमात त्यांच्या सहका-यांनाही काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश देण्यात येईल. पद्माकर वळवी यांच्या काँग्रेस प्रवेशाने नंदूरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला आणखी ताकद मिळेल. काँग्रेसचा विचार हाच सर्वांना सोबत घेऊन जाणारा तसेच लोकशाही व संविधान अबाधित राखणारा पक्ष आहे. इतर पक्षातूनही आणखी अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ इच्छूक आहेत”. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. मागील आठवड्यात परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी हजारो समर्थकांसह काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह इतर पक्षातील नेत्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ