शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

By admin | Updated: October 29, 2015 01:09 IST

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासमवेत बैठकांच्या फेऱ्या होऊनही काहीच निष्पन्न होत नसल्याने अखेर १३९ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची घोषणा फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन

पुणे : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासमवेत बैठकांच्या फेऱ्या होऊनही काहीच निष्पन्न होत नसल्याने अखेर १३९ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची घोषणा फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) स्टुडंट असोसिएशनने बुधवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे संस्थेतील शैक्षणिक वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत. तथापि, आंदोलन मागे घेतले असले, तरी गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी होईपर्यंत विरोध कायम राहणार असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. राकेश शुक्ला म्हणाला, की केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांसह राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्याबरोबर झालेल्या सर्वच बैठका निष्फळ ठरल्या. (प्रतिनिधी)एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड योग्य नसल्याने त्यांना हटवावे, यासाठी १२ जूनपासून विद्यार्थ्यांनी बंद पुकारला होता.गत १३९ दिवस विद्यार्थी वर्गात न जाता अहिंसक मार्गाने लढत होते. आंदोलनाला राहुल गांधी, नगमा, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक राजकीय नेते व अभिनेत्यांनी भेटी देऊन समर्थन दिले. अनेक सेलिब्रिटींनी टिष्ट्वटरवर पाठिंबा दिला.विद्यार्थ्यांवर ‘नक्षलवादी’ म्हणून आरोप झाले. संचालकांना घेराव घातल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून मुलांना अटकही केली.विद्यार्थ्यांनी १८ दिवस उपोषणदेखील केले. विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी केंद्राने एस.एम. खान कमिटी गठित केली; मात्र समितीने विद्यार्थ्यांच्या विरोधातच कौल दिला.केंद्रीय राज्यमंत्री, सचिव यांच्यासोबत विविध बैठका, पण तोडगा नाही.माझे काम आणि सकारात्मकतेने मने जिंकणार -चौहानआपले काम आणि सकारात्मक दृष्टिकोन या माध्यमातून विद्यार्थ्यांची मने जिंकण्यावर आपला भर असेल, असे सांगून एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी १३९ दिवसांचा संप मागे घेण्याच्या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.