शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे

By admin | Updated: March 18, 2015 02:02 IST

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने दहावीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे.

मुंबई : त्रयस्थ समितीमार्फत शाळांची सुरू असलेली फेरतपासणी पूर्णत: रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी शिक्षण उपसचिवांनी घेतल्याने महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने दहावीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. शिक्षक बुधवारपासून दहावी पेपर तपासणीचे काम सुरू करणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.शिक्षण विभागाने विनाअनुदानित शाळांची यापूर्वी अनेक समित्यांमार्फत तपासणी करून शाळांना अनुदानास पात्र ठरवले आहे. बहुतांश शाळा अपात्र ठरल्यानंतर पुन्हा त्रयस्थ समितीकडून शाळांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अनुदानास पात्र ठरलेल्या अनेक शाळा चुकीची कारणे दाखवून अपात्र ठरविण्यात आल्याप्रकरणी कृती समितीने त्रयस्थ समिती रद्द करून पात्र झालेल्या शाळांना अनुदान देण्याच्या प्रमुख मागणीसाठी समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. तावडे यांनी त्रयस्थ समिती रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शिक्षण विभागाकडून हे आश्वासन पाळले जात नसल्याने शिक्षकांनी दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. शिक्षणमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केल्यानंतर ही शाळांची फेरतपासणी सुरूच राहिल्याने समितीने आपले आंदोलन अधिकच तीव्र केले होते. अखेर शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार यांनी शाळांची फेरतपासणी करण्याचा निर्णय रद्द केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यानुसार बुधवारपासून पेपर तपासण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)शाळा कृती समितीने दहावीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. शिक्षक बुधवारपासून दहावी पेपर तपासणीचे काम सुरू करणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.