५०० रुपये प्रति तास दरात अयानने आठवेळा वापरला 'तो' फ्लॅट ! परतवाडा केसमध्ये धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:41 IST2026-04-18T16:37:14+5:302026-04-18T16:41:34+5:30

Amravati : मेळघाटातील बी.एस्सी.चा विद्यार्थी ते डझनावर मुलींच्या आयुष्याशी खेळणारा 'व्हिडीओ कांड'चा मुख्य सूत्रधार असलेल्या अयान अहमदच्या विकृतीचा रोज नव्याने पर्दाफाश होत आहे.

Ayan used 'that' flat for eight weeks at a rate of Rs 500 per hour! Shocking revelations in the Parthwada case | ५०० रुपये प्रति तास दरात अयानने आठवेळा वापरला 'तो' फ्लॅट ! परतवाडा केसमध्ये धक्कादायक खुलासे

Ayan used 'that' flat for the eighth time at a rate of Rs 500 per hour!

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
मेळघाटातील बी.एस्सी.चा विद्यार्थी ते डझनावर मुलींच्या आयुष्याशी खेळणारा 'व्हिडीओ कांड'चा मुख्य सूत्रधार असलेल्या अयान अहमदच्या विकृतीचा रोज नव्याने पर्दाफाश होत आहे. १३ एप्रिल रोजी रात्रीपासून पोलिसांच्या ताब्यात असलेला अयान हा २१ एप्रिलपर्यंत पोलिसांचा 'पाहुणा' आहे.

अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका टू-बीएचके फ्लॅटमध्ये अयानने काही मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले. याप्रकरणात अटक आरोपी मानव सुगंधे याने अयानला ५०० रुपये प्रति तास या दराने हा फ्लॅट उपलब्ध करून दिला होता. १६ एप्रिल रोजी पोलिसांनी या ठिकाणी क्राइम सीन रिक्रिएट केला. धक्कादायक बाब म्हणजे, शेजाऱ्यांना या फ्लॅटमधील संशयास्पद हालचालींची माहिती होती, मात्र फ्लॅट मालकाच्या उद्दामपणामुळे कुणीही तक्रार करण्याचे धाडस केले नाही. अयानने या फ्लॅटचा वापर दोन मुलींवर सात ते आठ वेळा लैंगिक अत्याचारासाठी केल्याची कबुली दिली आहे. तो फ्लॅट मालकही पोलिसांच्या रडारवर आहे.

एसआयटी ४५ सदस्यांची आणि जप्त केलेले पुरावे

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आयपीएस अधिकारी डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली ४५ सदस्यांचे विशेष तपास पथक गठीत करण्यात आले आहे. पोलिसांनी अयानकडून आठ पीडितांचे १८ अश्लील व्हिडीओ, ३९ छायाचित्रे जप्त केली आहेत. यातील दोघींवर त्याने अमरावतीच्या त्या फ्लॅटवर अत्याचार केला. अयानने हे सर्व व्हिडीओ 'मस्ती' म्हणून आणि मुलींच्या संमतीने काढल्याचा दावा केला असला, तरी कायद्याच्या कचाट्यात तो पूर्णपणे अडकला आहे. हा फ्लॅट ग्रामिण पोलिसांकडून घटनास्थळ म्हणून नोंदविला गेला आहे.

फ्लॅट आणि कॅफेंचा पंचनामा

अयान अहमदने पीडितांचे शोषण करण्यासाठी मानव सुगंधे याच्या मालकीचा कठोरा रोड येथील भाड्याचा फ्लॅट वापरला होता. पोलिसांनी या फ्लॅटची कसून झडती घेतली असून, फ्लॅट मालकालाही चौकशीचा फेरा सहन करावा लागणार आहे. एवढेच नाही तर, अयान ज्या कॅफेंमध्ये पीडितांना भेटायचा, त्या अमरावती शहरातील कॅफे रॉयल १०, अचलपुरातील 'कॅफे फ्रेंड्स टाऊन' आणि परतवाड्याच्या कॅफे सोशल जंक्शन'सह वड्झर डॅम परिसरातील गार्डनचाही पंचनामा करण्यात आला.

आतापर्यंत आठ अटक, दहा जण चौकशीत

या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, १० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असले तरी अधिकृत अटक झालेली नाही. दरम्यान, एसआयटीतील महिला पोलिस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्याशी पीडितांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना न घाबरता संपर्क साधावा व सोबतच त्यांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी पीडितांचे नाव आणि ओळख पूर्णतः गुप्त राखण्याची ग्वाही दिली आहे.


 

Web Title : परतवाड़ा मामला: अय्यान ने ₹500/घंटे पर फ्लैट आठ बार इस्तेमाल किया!

Web Summary : वीडियो कांड के आरोपी अय्यान ने अमरावती के कठोरा नाका में एक फ्लैट का इस्तेमाल यौन उत्पीड़न के लिए किया, जिसके लिए ₹500/घंटे का भुगतान किया गया। पुलिस ने अपराध स्थल को फिर से बनाया। एसआईटी जांच कर रही है, और आठ गिरफ्तारियां हुई हैं। पीड़ितों को आगे आने के लिए प्रोत्साहित किया गया है।

Web Title : Paratwada Case: Ayyan Used Flat Eight Times for ₹500/Hour!

Web Summary : Ayyan, accused in a video scandal, used a flat in Kathora Naka, Amravati, for sexual assault, paying ₹500/hour. Police recreated the crime scene. An SIT is investigating, and eight arrests have been made. Victims are encouraged to come forward.