चिमुकलीवर अत्याचार

By Admin | Updated: August 21, 2014 01:07 IST2014-08-21T01:07:06+5:302014-08-21T01:07:06+5:30

मंगळवारी रात्री ९.३० वाजताची वेळ. मुलीच्या रडण्याचा आवाज कानी पडताच परिसरातील काही लोकांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला. एक सहा वर्षीय बालिका गावाच्या गोदरीत रक्ताच्या थारोळ्यात असह्य

Atrocities on the Chimukulla | चिमुकलीवर अत्याचार

चिमुकलीवर अत्याचार

सिंदी (रेल्वे) येथील घटना : शस्त्रक्रियेनंतर पीडिता अतिदक्षता विभागात
वर्धा : मंगळवारी रात्री ९.३० वाजताची वेळ. मुलीच्या रडण्याचा आवाज कानी पडताच परिसरातील काही लोकांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला. एक सहा वर्षीय बालिका गावाच्या गोदरीत रक्ताच्या थारोळ्यात असह्य वेदनेने विव्हळत होती. हे दृश्य बघून सारेच अवाक् झाले. तिला लगेच्ं प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. नंतर तिला सेवाग्राम रुग्णालयात हलविले. कुण्यातरी नराधमाने अतिप्रसंग करुन तिची ही अवस्था केली असावी, असा संशय तपासात खरा निघाला. ही घटना सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे) येथील आहे.
याप्रकरणी बुधवारी सायंकाळी इरफान शहा मजलिन शहा (२३) रा. लादेननगर सिंदी (रेल्वे) याला सिंदी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३७६ तसेच लहान मुलांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कलम ३, ६, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सेलू तालुक्याचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी असलेले पोलीस उपअधीक्षक (गृह) आर. जी. किल्लेकर यांनी लगेच रुग्णालय गाठले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ते दिवसभर सिंदीत ठाण मांडून होते. त्यांच्या समक्ष तपासाची संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
सिंदी येथील एका वस्तीतील पीडित बालिकेचे कुटुंबीय रात्री गावातीलच एका नातेवाईकाकडे काही कामानिमित्त गेले होते. मुलगी घरी एकटीच होती. सुमारे अर्ध्या तासांनी वडिल घरी आले असता मुलगी घरात दिसली नाही. तिचा शेजाऱ्यांकडे शोध घेतला. मात्र कुठेच पत्ता लागला नाही. काही वेळातच गावातील काही लोकांना त्याच परिसरात मुलगी रक्ताच्या थारोळ्यात वेदनेचे विव्हळत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच तिच्या पित्याला बोलावून स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. बालिकेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवाग्रामला हलविण्याचा सल्ला दिला. सिंदी (रेल्वे) ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई ममता यांनी तिला रात्री १.३० वाजताच्या सुमारास सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती केले. दिवसभर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपीला अटक केली. त्याने घटनेची कबुली दिल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Atrocities on the Chimukulla