शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

"कॅमेऱ्याबरोबर भ्रष्ट, अभ्रष्ट ठरवणाऱ्या दूषित लेन्सचा तुम्ही कधीपासून वापर करायला लागलात?"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 2:53 PM

Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. "आगामी लोकसभेत भाजपाचे 400 जागांचा आकडा पार करण्याचे स्वप्न आहे. पण, आता हीच वेळ आहे, एका व्यक्तीचे आणि पक्षाचे सरकार हद्दपार करावे लागेल. हे सरकार आपल्या देशासाठी धोकादायक आहे. आम्ही सर्वजण इथे निवडणूक प्रचारासाठी नाही, तर लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आलो आहोत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, अशा लोकांनाच भाजपने पक्षात सामावून घेतले आहे."

"भाजपाने भ्रष्टाचाऱ्यांना त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ केले. हा भ्रष्टाचाराने भरलेला पक्ष सरकार कसे चालवू शकतो? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्धवजींसारखा 'दोगला' मुख्यमंत्री मी आजपर्यंत पाहिलेला नाही!" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"उद्धवजींसारखा 'दोगला' मुख्यमंत्री मी आजपर्यंत पाहिलेला नाही! कॅमेर्‍याच्या लेन्स तुम्ही बदलता पण कॅमेर्‍याबरोबर भ्रष्ट आणि अभ्रष्ट ठरवणार्‍या दूषित लेन्सचा तुम्ही कधी पासून वापर करायला लागलात?" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

"उद्धवजी…..! गद्दारीचा घिसापीटा राग आळवताना आपण आमच्या पाठीत खंजीर खुपसलात, हे तुम्ही विसरू नका. अशा खंजीरखुपशांसोबतची तुमची आघाडी म्हणजे भ्रष्टाचारातल्या समस्त ढवळ्या-पवळ्या जमातीचं मनोमीलन आहे. त्यामुळे भाजपविरोधात आरोपांचा खोटा हंबरडा फोडून काही साध्य होणार नाही…."

"जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे; कारण मोदीजी आपल्या दिलेल्या प्रत्येक गॅरंटीला जागलेत. आताही ४०० पारचं उद्दिष्ट साध्य करून भाजपसह महायुतीचा विजयरथ दिमाखात उधळणार…मागच्या दोन्ही वेळांप्रमाणे जनता तुमची वेसण करकचून आवळणार…" असंही चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाPoliticsराजकारण