शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘’लोकसभा निवडणुकीत मते दिली नाहीत, म्हणून आता मराठी माणूस तुम्हाला आठवला का?’’, भाजपाचा ठाकरे गटाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 15:04 IST

Ashish Shelar Criticize Shiv Sena UBT: विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबईतील इमारतींमध्ये मराठी माणसांसाठी ५० टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे. त्यावरून आता मुंबईतील राजकीय वर्तुळात एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबईतील इमारतींमध्ये मराठी माणसांसाठी ५० टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे. त्यावरून आता मुंबईतील राजकीय वर्तुळात एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. दरम्यान, अनिल परब यांनी केलेल्या मागणीवरून भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत मते दिली नाहीत, म्हणून आता मराठी माणूस तुम्हाला आठवला का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. 

अनिल परब यांनी केलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी विचारले की, आघाडीचे सरकार असताना तब्बल ५० टक्के प्रीमियम बिल्डरांना माफ केलात, तेव्हा मराठी माणसाला ५० टक्के घरे राखीव ठेवा, असे  का सांगितले नाही? पत्रा चाळीतील मराठी माणसाच्या घरांमध्ये कट कमिशन खाल्ले, तेव्हा मराठी माणसांची तुम्हाला आठवण झाली नाही का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला. 

या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, २५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेत होतात, तेव्हा मराठी माणसांच्या घरांसाठी काय केलेत? लोकसभा निवडणुकीत मते दिली नाहीत, म्हणून आता मराठी माणूस तुम्हाला आठवला का? मराठी माणसाला ५० टक्क्यांचे आरक्षण मागायचे आणि उरलेल्या मध्ये "हिरव्यांना" घुसवायचे? असे तर नाही ना? अशी शंकाही आशिष शेलार यांनी उपस्थित केली. 

भाजपाने गिरणी कामगारांना घरे दिली, बीडीडी चाळीतील मराठी माणसाची हक्काची घरे उभी राहिली! नुसते भावनेचे घोडे कागदावर नाचवायचे आणि मराठी माणसाला वर्षानुवर्षे फसवायचे, अशा शब्दात आशिष शेलार यांनी अनिल परब यांनी केलेल्या मागणीची खिल्ली उडवली. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारAnil Parabअनिल परबBJPभाजपाMumbaiमुंबई