कलाकार स्टायलिश अंदाजात उपस्थिती लावणार ,गौरव होणार महाराष्ट्राच्या ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 19:55 IST2017-11-10T19:55:28+5:302017-11-10T19:55:54+5:30

महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील आघाडीचे दैनिक लोकमतने महाराष्ट्राच्या मातीतील स्टायलिश पैलू हेरुन गेल्या वर्षीपासून एका नव्या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे आयोजन दैनिक लोकमतच्या वतीने करण्यात येते.

Artists will be presenting stylish presentations, honors Maharashtra's 'Most Stylish Celebrities' | कलाकार स्टायलिश अंदाजात उपस्थिती लावणार ,गौरव होणार महाराष्ट्राच्या ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’

कलाकार स्टायलिश अंदाजात उपस्थिती लावणार ,गौरव होणार महाराष्ट्राच्या ‘मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींचा’

मुंबई : महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील आघाडीचे दैनिक लोकमतने महाराष्ट्राच्या मातीतील स्टायलिश पैलू हेरुन गेल्या वर्षीपासून एका नव्या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे आयोजन दैनिक लोकमतच्या वतीने करण्यात येते.यंदा या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योग जगतातील मान्यवर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. मराठी मातीत स्टाइलच्या प्रतिमेला पुरस्काराचे कोंदण देण्याच्या अभिनव कल्पनेने उभा महाराष्ट्र मोहरून गेला आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे.कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश व्यक्तीमत्त्वांना या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे. येत्या 14 नोव्हेंबरला हा सोहळा रंगणार आहे. 
मराठी चित्रपटसृष्टी असो बॉलिवूड किंवा मग टीव्ही, फॅशन आणि उद्योग जगतातील कोणतीही व्यक्ती या पुरस्काराचा मानकरी ठरु शकते.या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभणार आहे.गेल्यावर्षी सोनम कपूर,सोनाली बेंद्रे,राधिका आपटे,सई ताम्हणकर,अमृता खानविलकर यासह अनेक सेलिब्रेटींचा खास अंदाज पाहायला मिळाला होता.त्यामुळे यंदाच्या सोहळ्याला उपस्थिती लावणारे सेलिब्रेटी कोणत्या अंदाजात रेड कार्पेटवर अवतरणार याची सा-यांनाच उत्सुकता आणि प्रतीक्षा लागली आहे. 

Web Title: Artists will be presenting stylish presentations, honors Maharashtra's 'Most Stylish Celebrities'