क्रिकेट सट्टेबाजांना अटक व सुटका

By Admin | Updated: May 31, 2014 01:10 IST2014-05-30T20:53:49+5:302014-05-31T01:10:29+5:30

अकोला शहरातील आणखी दोन सट्टेबाजांना अटक; जामिनावर सुटका

The arrest and release of cricket speculators | क्रिकेट सट्टेबाजांना अटक व सुटका

क्रिकेट सट्टेबाजांना अटक व सुटका

अकोला : शहरातील दोन सट्टेबाजांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरून कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी आणखी दोन क्रिकेट सट्टेबाजांना गजाआड केले आणि सायंकाळी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. शहरातील दोन सटोडिये ६ एप्रिलपासून आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लाखो रुपयांचा सट्टा लावत असल्याची माहिती कोतवाली पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिरुद्ध आढाव व त्यांच्या चमूला मिळाली होती. ही माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिरुद्ध आढाव यांनी जठारपेठेतील अनिल उर्फ बंटी नारायणदास बाजोरिया (३८) आणि अग्रसेन भवनजवळ राहणारा ॲड. ओमप्रकाश पुरुषोत्तम गोयनका (५४) हे क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असताना, त्यांना रंगेहात पकडले. या दोघांच्या मोबाईलमध्ये त्यांनी सट्टा व्यवहारासाठी कोणाला कॉल केले किंवा कोणाचे कॉल त्यांना आले, याची माहिती प्राप्त झाली. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलमधील कॉल डाटा जप्त केला होता. डाटामधून शहर व शहराबाहेरील ३0 ते ३५ जणांची नावे समोर आली आहेत. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी संघवीवाडीत राहणारा महेश महावीरप्रसाद अग्रवाल आणि बोरगाव मंजू येथे राहणारा रवी श्रीनारायण अग्रवाल या दोघांना अटक करून त्यांना कोठडीत डांबले. सायंकाळी जामिनावर आरोपींची सुटका करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी एका गॅस एजन्सीचा संचालक असलेल्या राजेश उर्फ मुन्ना विजय राठोड याला अटक केली होती.

Web Title: The arrest and release of cricket speculators