शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला पुन्हा लष्कराची सलामी

By admin | Updated: December 30, 2014 01:30 IST

गेल्या चार वर्षांपासून खंडीत झाली होती़ ही परंपरा यंदाच्या १ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार असल्याने या विजयस्तंभाला खऱ्या अर्थाने विजयी सलामी मिळणार आहे़

मुंबई : पुण्यातील भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला लष्कराच्या महार रेजिमेंटकडून दिली जाणारी मानवंदनेची परंपरा गेल्या चार वर्षांपासून खंडीत झाली होती़ ही परंपरा यंदाच्या १ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार असल्याने या विजयस्तंभाला खऱ्या अर्थाने विजयी सलामी मिळणार आहे़ ब्रिटिश व दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात १ जानेवारी १८१८ रोजी लढाई झाली़ यात ब्रिटिशांकडून लढलेल्या महार बटालियनच्या ५०० सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैन्याचा दारुण पराभव केला. या लढाईनंतर पेशवाईचा अंत झाला़ यात महार बटालियनचे २२ सैनिक शहीद झाले होते़ त्यांच्या स्मरणार्थ भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आला़ या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी १ जानेवारीला या शहिदांना मानवंदना देण्यास हजारो जण येतात़ खुद्द डॉ़ बाबासाहेब आंबेडकरदेखील येथे या वीरांना मानवंदना देण्यासाठी येत होते. स्वातंत्र्यानंतर लष्करातील महार रेजिमेंट येथे मानवंदना देण्यासाठी येत होती़ मात्र गेल्या काही वर्षांत ही मानवंदना काही कारणांमुळे बंद झाली़ अखेर महार रेजिमेंट माजी सैनिक संघटनेचे माजी सुभेदार मेजर दत्ताराम मोहिते, सुभेदार जाधव, हवालदार शांताराम सावंत, हवालदार संजय तांबे, हवालदार रमेश कदम, हवालदार दिलीप सावंत, नायक राजेश पवार यांनी ही मानवंदना पुन्हा सुरू करण्यास पाठपुरावा केला़ याची दखल घेत या संघटनेला मध्य प्रदेशच्या सागर येथील महार रेजिमेंट ट्रेनिंग सेंटरमधील कमांडिंग आॅफिसर व इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ही मानवंदना यंदापासून पुन्हा देण्यात येईल, असे आश्वासन दिले़ (प्रतिनिधी)