शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारेंची मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका, क्लोजर रिपोर्टला विरोध, कथित शिखर बँक घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 06:36 IST

Anna Hazare : ऑक्टोबर २०२० मध्ये ईओडब्ल्यूने २५,००० कोटी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. हा अहवाल स्वीकारू नये, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विशेष एसीबी न्यायालयात निषेध याचिका दाखल केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकार बँक कथित घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारू नये, यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुंबई सत्र न्यायालयात निषेध (प्रोटेस्ट) याचिका दाखल केली आहे.ऑक्टोबर २०२० मध्ये ईओडब्ल्यूने २५,००० कोटी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. हा अहवाल स्वीकारू नये, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विशेष एसीबी न्यायालयात निषेध याचिका दाखल केली आहे.त्यांनी केलेल्या याचिकेनुसार, त्यांनी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी क्रॉफर्ड रोड येथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. मात्र, अद्याप पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला नाही आणि आरोपींची चौकशी न करताच पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला.या प्रकरणी दुसरे तक्रारदार सुरिंदर अरोरा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करताच पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सहकारी साखर कारखान्यांच्या भागधारकांचेही जबाब नोंदविण्यात आले नाहीत. तसेच कॅग, नाबार्डने सादर केलेले अहवाल विचारात घेण्यात आला नाही, असे हजारे यांनी याचिकेत म्हटले आहे. आज, शनिवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेCourtन्यायालय