महाराष्ट्र दिनी अमृता फडणवीस यांचं 'नमन तुला' गाणं रिलीज, रितेश देशमुखचीही खास झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 08:00 IST2026-05-01T08:00:00+5:302026-05-01T08:00:01+5:30
अमृता फडणवीस यांचं नमन तुला गाणं ऐकलंत का?

महाराष्ट्र दिनी अमृता फडणवीस यांचं 'नमन तुला' गाणं रिलीज, रितेश देशमुखचीही खास झलक
'महाराष्ट्र दिन' हा राज्यातील प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक असा दिवस आहे आणि यानिमित्ताने अभिवादन म्हणून अमृता फडणवीस यांनी ‘नमन तुला’ हे गीत सादर केले आहे. एक असे गीत जे गौरवगीताची भावना अचूकपणे व्यक्त करते. भूषण कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत हे गीत छत्रपती शवाजी महाराजांप्रती असलेली गाढ कृतज्ञता आणि भक्ती व्यक्त करते, जी महाराष्ट्रतील प्रत्येक माणसाच्या मनाला स्पर्श करते. अमृता फडणवीस यांच्या भावपूर्ण आवाजासह आणि रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत हे गीत राज्य स्थापनेच्या दिवसासाठी एक समर्पक संगीतात्मक पार्श्वभूमी ठरते. भव्य आणि पारंपरिक महाराष्ट्रीय सेटवर चित्रित, शक्ती हसीजा दिग्दर्शित हा म्युझिक व्हिडीओ केवळ एक सादरीकरण नसून एक सिनेमॅटिक प्रवास आहे
नचिकेत बर्वे यांनी डिझाइन केलेल्या नऊवारी साडीत अमृता फडणवीस अत्यंत देखण्या दिसत आहेत. रितेश देशमुख यांची विशेष उपिस्थती या व्हिडीओला आणखी एक भावनिक रुप देत आहे. पवन बॉब यांच्या कोरिओग्राफीमुळे व्हिडीओची दृश्यात्मक आकर्षकता अधिक खुलते, ज्यात सहजपणे नजाकत आणि ताकद यांचा संगम दिसतो जो गाण्याच्या भावनिक व सांस्कृतिक गाभ्याला पूरक ठरतो.

अमृता केवळ भूमिका साकारत नाहीत तर ती जगतात. नर्तकीच्या नाजूक हालचालींपासून ते हातात शस्त्र घेऊन योद्ध्याच्या तीव्र ऊर्जेपर्यंत त्या सहजपणे रूपांतर करतात. दिग्गज अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत पारंपरिक पोवाड्यांची आत्मा आणि आधुनिक ध्वनी यांचा सुंदर मेळ घालते जो आजच्या तरुणांशी जोडला जातो. या गीताच्या केंद्रस्थानी अमृता फडणवीस यांचा प्रभावी आवाज आहे, ज्यातून त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपला मनःपूर्वक 'नमन' अर्पण करतात. आणि त्यांना आदरपूर्वक 'सह्याद्रींचे राजे' असे संबोधतात.
या गीताची खास गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचा अभिमान जिवंत केला आहे. चैतन्य कुलकर्णी यांनी लिहिलेल्या गीतांमध्ये या किल्ल्यांचा नावानीशी उल्लेख आहे. तर अमृता यांच्या आवाजातून त्या शूर वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त होते ज्यांनी या भूमीचे रक्षण करण्यासाठी आणि स्वराज्याची भावना जपण्यासाठी आपले प्राण अर्पण केले.
या गीताबद्दल बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “महाराष्ट्र दिन हा फक्त दिनदर्शिकेतील एक दिवस नाही ती एक भावना आहे जी आपल्या सर्वांच्या मनात जिवंत आहे. ‘नमन तुला’द्वारे मला महाराष्ट्रीय असण्याचा आणि त्या भूमीचा भाग असल्याचा अपार अभिमान व्यक्त करायचा होता जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपस्थितीने पावन झाली आहे. हे गीत माझ्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक नम्र प्रयत्न आहे - फक्त त्यांच्यासाठीच नव्हे, तर आपल्या इतिहास आणि शक्तीचे प्रतीक म्हणून उभ्या असलेल्या किल्ल्यांसाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी नि:स्वार्थपणे प्राण अर्पण करणाऱ्या असंख्य मावळ्यांसाठीही. या व्हिडीओचा भाग म्हणून रितेशचा सहभाग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांच्या उपिस्थितीमुळे या गाण्यात एक वेगळी ऊर्जा येते आणि मला वाटते की त्यामुळे या गाण्याची भावना अधिक प्रभावी होते. माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की प्रेक्षकांचे लक्ष केवळ व्यावसायिक गाण्यांपुरते मर्यादित न राहता भक्ती आणि देशभक्ती या दोन्ही विषयांचा उत्सव साजरा करणाऱ्या संगीताकडे वळावे. मला मनापासून आशा आहे की हे गीत तरुणांच्या मनात अभिमान आणि उत्साहाची भावना जागवेल आणि माझ्या पद्धतीने मला छत्रपती शिवाजी महाराजांना काहीतरी परत देण्याची संधी मिळेल ज यांनी आपल्याला खूप काही दिले आहे."

म्युझिक व्हिडीओचा भाग होण्याबद्दल रितेश देशमुख म्हणाले, “जेव्हा मी 'नमन तुला' पहिल्यांदा ऐकले तेव्हा खरंच माझ्या अंगावर शहारे आले. अमृता मॅडम यांनी इथे खूप सुंदर काम केले आहे . आपल्या महाराष्ट्रातील माणसांच्या मनात छत्रपती शवाजी महाराजांबद्दल असलेली गाढ कृतज्ञता त्यांनी अचूकपणे पकडली आहे. महाराष्ट्र दिन नेहमीच माझ्या मनाजवळचा राहिला आहे. तो मला केवळ छत्रपती शवाजी महाराजांनाच नव्हे, तर त्या प्रत्येक मावळ्याला नमन करण्याची आठवण करून देतो ज्यांनी या भूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण केले. अशा मनापासून आणि मुळांशी जोडलेल्या प्रकल्पाचा एक छोटासा भाग होण्याचा मला खूप सन्मान वाटतो - जय महाराष्ट्र!”
‘नमन तुला’ हे केवळ एक गीत नसून इतिहास, शौर्य आणि पराक्रमाचा उत्सव आहे. हे गीत आता सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे आणि त्याचा म्युझिक व्हिडीओ टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येईल.