शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

युतीची चर्चा केवळ मुंबईपुरती!

By admin | Updated: January 17, 2017 06:43 IST

मुंबई महापालिकेपुरती मर्यादित असल्याने ठाणेसह इतर महापालिकांत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.

मुंबई : शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये सुरू झालेली युतीसंदर्भातील चर्चा केवळ मुंबई महापालिकेपुरती मर्यादित असल्याने ठाणेसह इतर महापालिकांत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.मंत्रालयासमोरील बी-७ बंगल्यावर झालेल्या या चर्चेत भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार सहभागी झाले तर शिवसेनेतर्फे खा. अनिल देसाई, आ. अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर सहभागी झाले. भाजपाकडून युतीमध्ये १०६ जागांची मागणी करण्यात आली. मुंबई महापालिकेत नगरसेवकांची एकूण संख्या २२७ आहे. युतीच्या जागावाटपात आपण ‘मोठा भाऊ’ असावे असा आग्रहच एकप्रकारे भाजपाने धरला आहे. विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या ताकदीच्या आधारे भाजपाने या जागांवर दावा केला आहे. शिवसेनेने भाजपासाठी जास्तीत जास्त ७५ जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. भाजपाने मागितलेल्या जागांमध्ये गेल्या वेळी जिंकलेल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)पारदर्शक कारभारावर चर्चा या बैठकीत जागावाटपावर नव्हे, तर पारदर्शक कारभारावर चर्चा झाल्याची माहिती खा. अनिल देसाई व आशिष शेलार यांनी दिली. शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तर भाजपाच्या प्रस्तावावर शिवसेनेचे नेते हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर पुढील बैठकीत पुन्हा चर्चा होईल.