शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

"गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर...", ४ उद्योग राज्याबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 21:13 IST

राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांवरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. खोके सरकारच्या नाकर्तेपणाची आणि उद्योगजगताचा सध्याच्या सरकारवर अजिबात विश्वास नसण्याची साक्ष देणारी 'श्वेतपत्रिका' आज प्रकाशित झाली असल्याचा घणाघात ठाकरेंनी केला. तसेच महाराष्ट्राबाहेर गेलेले ४ मेगा प्रकल्प हा या श्वेतपत्रिकेचा विषय असून मविआ सरकारच्या काळात जे उद्योग व प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी अंतिम टप्प्यावरची चर्चा केली जात होती. तेच प्रकल्प बेकायदेशीर खोके सरकार येताच आणि त्यांच्या नेतृत्वाला भेटताच कसे महाराष्ट्रातून तळ हलवून बाहेर गेले ह्याचा हा ढळढळीत पुरावा आहे, असे ठाकरेंनी म्हटले. 

आदित्य ठाकरेंची बोचरी टीका राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मिंधे-भाजपचा महाराष्ट्राविषयीचा द्वेष आणि खोके सरकार स्थापन झाल्यावर उद्योग कसे दुसऱ्या राज्यात पाठवले गेले. गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रताप केल्याने, सद्य परिस्थितीवर उद्योग जगताचा कसा अजिबात विश्वास उरलेला नाही हे निदर्शनास आले. राज्यात दुर्दैवाने एक पूर्णपणे अकार्यक्षम बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी उद्योजकांच्या भेटींनंतर स्वहस्ते उद्योगधंदे राज्याबाहेर ढकलून दिले. श्वेतपत्रिकेत वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस-टाटा, बल्क ड्रग पार्क, सेफ्रॉन उद्योगांचा उल्लेख असताना, महाराष्ट्रापासून दूर ढकललेल्या इतर उद्योगांचा उल्लेख करण्यात आलेला नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सरकारचा समाचार घेतला. 

तसेच बल्क ड्रग पार्कबद्दलच्या उल्लेखावरून तर हे सिद्ध होते की, मोठ्या प्रमाणात औषध उत्पादनासाठी महाराष्ट्र हा सर्वतोपरी सर्वोत्तम पर्याय असूनही हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले गेले. सर्वच्या सर्व ३ पार्क नाही, तरी किमान १ पार्क तरी महाराष्ट्राला मिळायलाच हवे होते. एकंदरीतच, हा अहवाल महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता, की राज्याला एक नाकर्ता मुख्यमंत्री आणि माहितीशून्य उद्योगमंत्री आहे हे सिद्ध करण्यासाठीच प्रकाशित केला? असा प्रश्न मला पडतोय. त्यांनी अधिकृतपणे मांडलेला रेकॉर्ड पाहता, दोघांनाही महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या मंत्रिमंडळात स्थानच मिळणार नाही, असेही आदित्य ठाकरेंनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले. 

ठाकरेंचा घणाघात "धोकेबाजीने सत्तेत आलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारमधले हे एक इंजिन तर पूर्णपणे फेल गेलेले आहे. तसंच, खोके सरकारने सांगितल्याप्रमाणे 'वेदांता फॉक्सकॉन' प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, त्या प्रकल्पाचा ह्या श्वेतपत्रिकेत उल्लेखही नाही. त्यात वेदांत फॉक्सकॉनच्या “फॉरवर्ड इंटिग्रेशन” प्रकल्पाचाही साधा उल्लेख करण्यात आलेला नाही, ज्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले होते. तो प्रकल्प अजूनही सुरू आहे का?", अशा प्रश्न देखील त्यांनी विचारला. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र