शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी हॉटेलवर थांबा देणा-या चालक-वाहकांवर कारवाई

By admin | Updated: August 13, 2014 03:29 IST

एसटीच्या चालक-वाहकांकडून खासगी हॉटेलवर अनधिकृत थांबा काही ठिकाणी दिला जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री पडते.

मुंबई : एसटीच्या चालक-वाहकांकडून खासगी हॉटेलवर अनधिकृत थांबा काही ठिकाणी दिला जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री पडते. वर्षानुवर्षे ही लूटमार सुरू असताना कुठलेही पाऊल न उचलणाऱ्या एसटी महामंडळाकडून आता थेट एसटी चालक-वाहकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. असे थांबे देणे ही गंभीर बाब असल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले. एसटी गाड्यांचे नसलेले नियोजन, न मिळणाऱ्या सुविधा इत्यादी कारणांमुळे महामंडळाचे प्रवासी आणि उत्पन्न कमी होत आहे. त्याचा फटका महामंडळाला आणि प्रवाशांना बसत असतानाच एसटीच्या दुर्लक्षित कारभाराचा आणखी एक फटका प्रवाशांना बसत आहे. एसटीच्या काही मार्गांवर चालक आणि वाहकांकडून खासगी हॉटेलवर अनधिकृत थांबे देण्यात येतात. यात चालक आणि वाहकांना कमिशन मिळत असल्यानेच हे थांबे देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. एसटीच्या शिवनेरी बसमधून मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तर त्याचा सर्वाधिक फटका बसतो. या मार्गावर असणाऱ्या खासगी हॉटेलवर थांबा नसतानाही अनधिकृत थांबा देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते. त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जात होते. मात्र आता असे अनधिकृत थांबे खासगी हॉटेलवर देणाऱ्या चालक आणि वाहकावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे गोरे यांनी सांगितले. अनधिकृतपणे थांबा देणे चुकीचे आहे. त्यावर कटाक्षाने लक्ष दिले जाईल आणि दोषी आढल्यास नियमानुसार त्या चालक आणि वाहकावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.