शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

आजोबांसोबत शेतात जाणाऱ्या नातीचा बिबट्यानं घेतला बळी; अंगावर शहारे आणणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 17:54 IST

आजोबा काही अंतरावर चालत असल्याने त्यांना काही क्षणानंतर हल्ला झाल्याचे कळले. तोपर्यंत बिबट्याने दाट असलेल्या मक्याच्या पिकात तिला फरफटत नेले होते.

नंदूरबार - मका काढण्यापूर्वी केलेली मानता फेडण्यासाठी शेतात आजोबा आणि काकांसोबत जाणाऱ्या १० वर्षीय मुलीला बिबट्याने हल्ला करून फरफटत नेले. सोबत असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात येईपर्यंत मक्याच्या दाट शेतात ती दिसेनाशी झाली. तिच्या ओरडण्याचा आवाजही क्षीण झाला. एकीकडे बिबट्याची भीती तर दुसरीकडे मुलीला शोधण्याची धडपड अशा स्थितीत कुटुंबीयांनी तासभर मक्याचे शेत पिंजून काढले. त्यानंतर मध्यभागी मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडलेली पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

रेवानगर शिवारात रविवारी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास घडलेला हा प्रकार अंगावर शहारे आणणारा ठरला. दीपमाला नारसिंग पाडवी ही मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत शेतात जात होती. मका चांगला बहरल्याने आणि तो काढण्याची वेळ आल्याने त्यापूर्वी केलेली मानता फेडण्यासाठी कुटुंब शेतात जात होते. पुढे आजोबा आणि नात दीपमाला जात होते. शेताच्या बांधावरून जात असताना लगतच्या मक्याच्या शेतातून अचानक बिबट्याने मुलीवर हल्ला केला. आजोबा काही अंतरावर चालत असल्याने त्यांना काही क्षणानंतर हल्ला झाल्याचे कळले. तोपर्यंत बिबट्याने दाट असलेल्या मक्याच्या पिकात तिला फरफटत नेले होते.

आजोबांनी आरडाओरड करताच धावले नातेवाईक

शेतात आजोबांनी आरडाओरड करताच काही अंतरावर असलेले मुलीची आई, वडील आणि काका धावत आले. त्यांनी मक्याच्या शेतात जाण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्याच्या हल्ल्याची भीती होतीच. आरडाओरड केल्याने इतरही काही जण धावून आले. अखेर मक्याच्या शेतात शोधकार्य सुरू असताना १ तासानंतर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली आढलली. तिच्या गळ्यावर गंभीर जखम होती. शेतातून बाहेर काढल्यावर ती मयत झाल्याचे स्पष्ट झाले. ते पाहून नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. 

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी गणेश बुधावल शिवारात ४७ वर्षीय ललिताबाई पाडवी यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर २४ तासांतच रविवारी रेवानगर शिवारात ही घटना घडली. त्यामुळे तळोदा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सरदारनगर, बुधावल शिवारात वन विभागाने कॅमेरे, पिंजरे बसवले आहेत. पेट्रोलिंगही सुरू आहे. योग्य संधी मिळताच टॅक्युलाइझर गनने बेशुद्ध करून बिबट्याला रेस्क्यू करण्याची तयारी आहे असं वनक्षेत्रपाल शंतनू सोनवणे यांनी सांगितले. 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग