शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्तवरून ८४ टन कांदा मुंबईत

By admin | Updated: August 22, 2015 01:16 IST

कांद्याचे गगनाला भिडलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याची आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून तिन कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटीमध्ये आला असून शनिवारी

नामदेव मोरे, नवी मुंबईकांद्याचे गगनाला भिडलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याची आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून तिन कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटीमध्ये आला असून शनिवारी तो मुंबईत वितरीत केला जाणार आहे. पुढील आठवड्यात जवळपास १ हजार टन कांद्याची आयात होणार असून त्यामुळे भाव काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यासह पुर्ण देशामध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वाधीक कांदा उत्पादन होणाऱ्या नाशीकमधील होलसेल मार्केटमध्येही कांदा ५० ते ६० रूपये किलो दराने विकला जात आहे. मुंबईमध्येही कांद्याचे दर गगनाला भिडले असून किरकोळ मार्केटमध्ये कांदा ७० ते ८० रूपये किलो दराने विकला जात आहे. एलीगंड्स फुड्स या कंपनीने इजिप्तचा कांदा दुबईवरून समुद्राच्या मार्गे मागविला होता. गुरूवारी रात्री ३ कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटी बंदरामध्ये दाखल झाला आहे. श्री स्वामी समर्थ शिपींग कंपनीने सोपस्कर पुर्ण करून शुक्रवारी रात्री कांदा जेएनपीटी बंदराबाहेर काढला आहे. कंपनीचे मालक सचीन धुमाळ यांनी सांगितले की शनिवारी इजिप्तचा कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इजिप्तवरून ३० ते ४० कंटेनरमधून अजून १ हजार टन पेक्षा जास्त कांदा आयात केला आहे. हा कांदा पुढील आठ दिवसामध्ये जेएनपीटीमध्ये पोहचणार आहे. कांदा नाशीवंत असल्यामुळे शासनाने जेएनपीटी बंदरामध्ये एक दिवसामध्ये सर्व प्रक्रिया पुर्ण करून कांदा मार्केटमध्ये जाईल अशी व्यवस्था केली आहे. यामुळे पुढील आठवड्यात विदेशातील कांद्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजूनही इतर देशातून कांदा मागविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इजिप्तचा कांद्याचा दर्जाही चांगला असल्यामुळे तो ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.