शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५२ हजार रेशन दुकानदार संपावर;धान्य वितरण केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:43 IST

कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन दरम्यान सर्व व्यवहार बंद असताना रेशन दुकानदारांनी शासनाच्या निर्देशानुसार गरजू गरीब घटकांना धान्य वितरित केले....

ठळक मुद्देविमा संरक्षणाची मागणी : धान्य वितरण केले बंदमुख्यमंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे निवेदन

पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्गाचा धोका असतानाही रेशन दुकानदार धान्य वितरणाचे काम करीत आहेत. त्यांच्या आरोग्याचा तसेच जीवाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना शासनाने विमा संरक्षण द्यावे अशी मागणी होत आहे. मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने राज्यातील ५२ हजार रेशन दुकानदार संपावर गेले आहेत. सोमवारपासून (दि. १) सुरू आहे. त्यामुळे राज्यात रेशनिंगच्या धान्याचे वितरण ठप्प झाले आहे.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर फेडरेशनतर्फे संप पुकारण्यात आला आहे. डॉक्टर, परिचारिका, पोलीस यांच्यासह अनेक घटक कोरोनाच्या संकटात सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांचा कोरोना योद्धा म्हणून उल्लेख केला जातो. त्यांना शासनाने विमा संरक्षण दिले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन दरम्यान सर्व व्यवहार बंद असताना रेशन दुकानदारांनी शासनाच्या निर्देशानुसार गरजू गरीब घटकांना धान्य वितरित केले. अद्यापही याचे यंत्रणेच्या माध्यमातून शासन गरजू गरीब घटकापर्यंत धान्य पोहोच करीत आहे. त्यामुळे रेशन दुकानदार थेट हजारो लोकांच्या संपर्कात येतात. परिणामी त्यांनाही कोणाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत रेशन दुकानदार देखील कोरोना योद्धाच आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांचे मनोबल वाढविणे आवश्यक आहे. त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास कुटुंबियांना आधार मिळावा म्हणून रेशन दुकानदारांना विमा संरक्षण देण्याची मागणी फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. त्यांच्याकडून त्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला. त्यांच्याकडून आरोग्य खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र त्यांनी या प्रस्तावावर विचार केलेला नाही, असे फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या घटकांना शासन विमा कवच देत आहे. रेशन दुकानदार देखील शासनाचाच एक घटक म्हणून कार्यरत आहे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून हे दुकानदार धान्य वितरण करीत आहेत. पुण्यात एका दुकानदाराला कोरोनाची बाधा झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. - गजानन बाबर, अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉपकिपर फेडरेशन...............संपामुळे या दुकानदारांनी धान्य घेतले नसून त्याचे वितरण थांबविले आहे. त्यामुळे गरजू व गरीब लोकांना धान्य मिळालेले नाही. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून रेशन दुकानदार व त्यांच्या मदतनीस यांना विमा संरक्षण द्यावे. यातून त्यांचे मनोबल उंचावण्यास मदत होणार आहे.- विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर फेडरेशन

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारChagan Bhujbalछगन भुजबळ