शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

माणदेशात सापडले ३५०० वर्षांपूर्वीच्या वस्तीचे अवशेष!

By admin | Updated: October 26, 2015 00:10 IST

उत्खननासाठी प्रयत्न : पृष्ठीय सर्वेक्षणात आढळल्या शंखांपासून बांगड्या बनविणाऱ्या कारागिरांच्या पाऊलखुणा--लोकमत विशेष

राजीव मुळ्ये-- सातारा शंखांपासून बांगड्या तयार करणाऱ्या कारागिरांची वस्ती माणगंगेकाठी सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी, अशा निष्कर्षाप्रत नेणारे पुरावे माण तालुक्यात सापडले आहेत. पृष्ठीय सर्वेक्षणात सापडलेले असंख्य अवशेष थेट सातवाहन काळात नेणारे असून, कारागिरांनी वापरलेली अवजारे उत्तर ताम्रपाषाण युगातील असल्याचा अंदाज आहे.माण तालुक्यातील एका गावाजवळ माणगंगा नदीकिनारी प्रचंड संख्येने आढळलेले शंखांच्या बांगड्यांचे कातकाम केलेले तुकडे, बांगडी घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सहाणी, कोरीव कामासाठी वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्माश्म अवजारांचे तुकडे पाहता, निर्यातीसाठी बांगड्या बनविण्याचा कारखानाच येथे अस्तित्वात होता, या निष्कर्षाला अभ्यासक पोहोचले आहेत. सातारच्या जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेच्या सदस्यांनी हा ‘खजिना’ शोधून काढला असून, तिथे मोठ्या प्रमाणात अजूनही दिसत असलेल्या इतर अवशेषांना धक्का लागू नये म्हणून त्यांनी हे ठिकाण गोपनीय ठेवले आहे. येथे उत्खनन केल्यास अत्यंत प्राचीन संस्कृतीचा ठेवा गवसण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर उत्खननाशी संबंधित संस्थेशी संपर्क साधण्यात आला आहे. येथे सापडलेले शंख ‘टर्बुनिल्ला पायरम’ जातीचे असून, ते केवळ तमिळनाडू किंवा सौराष्ट्रातील खंबातच्या आखातात सापडतात. माणमध्ये सापडलेले शंख खंबातच्या आखातातील असावेत, असे दिसते. लाटेबरोबर वाहत आलेल्या मोठ्या शंखाच्या पोटात लहान शंख आढळतात, तेही येथे आढळले असून, बांगड्या बनविताना शंखाचा काढून टाकलेला गाभाही आढळला आहे. मेसोपोटेमिया भागातून शंखांच्या बांगड्यांना त्याकाळी मोठी मागणी होती. त्या भारतातून तिकडे जात असत, याचे पुरावे पूर्वीच आढळले आहेत. सिंधू संस्कृतीतही शंखांच्या बांगड्यांचे पुरावे आढळले असून, दंडापर्यंत बांगड्या घातलेल्या नर्तकीचे शिल्प हडप्पामध्ये सापडले होते. या शृंखलेची कडी माणदेशाशी जोडली गेल्याचा पुरावा आता सापडल्याने प्राचीन इतिहासाच्या दृष्टीने माण तालुक्यास मोठे महत्त्व प्राप्त होण्याची चिन्हे आहेत.झिलईच्या भांड्यांचे तुकडेही आढळलेधातूंच्या आधी धातूंची संयुगे माणसाला ज्ञात होती आणि मातीच्या भांड्यांना त्याची झिलई करण्यात येत होती, असे इतिहास सांगतो. ताम्रयुगाच्या अखेरचा हा काळ होय. माण तालुक्यात झिलई केलेल्या भांड्यांचे अवशेषही सापडले आहेत. उत्खनन केल्यास भट्टीही सापडू शकेल, असे जिज्ञासूंचे मत आहे.सातारा जिल्ह्याचा इतिहास प्रागैतिहासिक काळापर्यंत पोहोचणारा असल्याने अभ्यास आणि पर्यटन या दृष्टीने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पांढरीच्या टेकाडांचे संरक्षण करून ठिकठिकाणी उत्खनन झाल्यास निसर्ग पर्यटनाबरोबरच जिल्ह्यात ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल.- विक्रांत मंडपे, जिज्ञासा इतिहास संशोधन संस्था