शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

१९ शासकीय आश्रमशाळांचा गुंडाळला गाशा

By admin | Updated: September 4, 2014 00:52 IST

आदिवासी विकास विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांपैकी सुमारे १४ आश्रमशाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांचे समायोजन : १४ पूर्णपणे बंद तर ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंददिगांबर जवादे - गडचिरोलीआदिवासी विकास विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांपैकी सुमारे १४ आश्रमशाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. यातील जवळपास ९० कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पटसंख्येअभावी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा बंद करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आदिवासी विकास विभागाच्यावतीने राज्यात ५४७ शासकीय आश्रमशाळा व ५५६ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांंमध्ये सध्यास्थितीत ३ लाख ९८ हजार ९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्याच्या शिक्षणाबरोबरच राहण्याची व भोजनाचीही व्यवस्था केली जाते. त्यामुळे या आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एके काळी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र कालांतराने या आश्रमशाळांच्या देखभालीकडे आदिवासी विकास विभागाचे व शासनाचे दुर्लक्ष झाले. अनेक आश्रमशाळा जीर्ण इमारतीमध्येच भरविल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात छत गळत असल्याने विद्यार्थ्यांना अख्खी रात्र जागून काढावी लागते. आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचा सर्प व कीटकांच्या दंशाने मृत्यू झाला आहे. प्रत्येक गावात जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली आहे. शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. त्यामुळे कोसोदूर असलेल्या आश्रमशाळेमध्ये आपल्या मुलाला पाठविण्यास पालकवर्ग तयार होत नाही. परिणामी आश्रमशाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. बराचशा आश्रमशाळांमध्ये एका वर्गात ४ ते ५ विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश घेतला आहे. एवढ्या विद्यार्थ्यांसाठी लाखो रूपयांचा खर्च शासनाला करणे परवडत नसल्याने नागपूर विभागातील सुमारे १९ शासकीय आश्रमशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अहेरी, देवरी, चिमुर, चंद्रपूर, गडचिरोली या प्रकल्पांमधील १४ आश्रमशाळांचे सर्वच वर्ग बंद करण्यात आले आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ शाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. या आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका आदी जवळपास ९० कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत शासनाने हा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची फार मोठी ससेहोलपट झाली आहे. एवढ्या शाळा बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. भविष्यातही आश्रमशाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.