कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:07 IST2025-06-16T16:06:45+5:302025-06-16T16:07:22+5:30

जन्माला येताच बाळाच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं...!

madhya pradesh pregnant women died due to corona after delivering a baby in jabalpur | कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 

कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 


मध्य प्रदेशातील जबलपूर येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथे रविवार एका 27 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेने शनिवारी जबलपूर येथील एका सरकारी मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला होता. मात्र पुढच्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. संजय मिश्रा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ही महिला शेजारच्या मांडला जिल्ह्यातील रहिवासी होती आणि तिला आधीच फुफ्फुसाचा आजार होता.

डिलीव्हरीनंतर फुफ्फुसचा त्रास वाढला -
डॉ. मिश्रा म्हणाले, 'संबंधित महिला प्रसूतीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आली होती. तिने शनिवारी बाळाला जन्म दिला. यानंतर तिच्या फुफ्फुसात त्रास सुरू झाला. यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली. यानंतर, महिलेला आयसोलेशन वार्डात शिफ्ट करण्यात आले. तेथेच तिचा मृत्यू झाला. 

याशिवाय, रुग्णालयात आणखी  एका ७० वर्षीय वृद्धावर कोरोनाचा उपचार सुरू आहे. गेल्या एका आठवड्यात जबलपूरमध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत, असेही डॉ. मिश्रा म्हणाले.

Web Title: madhya pradesh pregnant women died due to corona after delivering a baby in jabalpur