शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच महामार्गावर लेडिज टॉयलेट; बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:49 IST

भाजप आ. चित्रा वाघ यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान महिलांच्या स्वच्छतागृहांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. 

मुंबई : राज्यातील महामार्गावर, तसेच शहरातील हॉटेलसह पेट्रोलपंप याठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व चांगली स्वच्छतागृहे असणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

भाजप आ. चित्रा वाघ यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान महिलांच्या स्वच्छतागृहांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. 

राज्यभर असलेली सार्वजनिक  स्वच्छतागृहांची अपुरी संख्या, त्यांची दुरवस्था आणि तेथे सुरक्षिततेचा अभाव यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना गर्भाशयाचा कर्करोगासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा राज्यभर उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी आ. वाघ यांनी केली. त्यावर मंत्री भोसले म्हणाले की, स्वच्छतागृहांची देखभाल होणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी राज्य सरकारमार्फत नियोजन करण्यात येत आहे. 

महिलांसाठीची स्वच्छतागृहे सुलभ इंटरनॅशनलसारख्या एखाद्या संस्थेला देणे किंवा जवळच्या गावातीलच महिला बचत गटास त्या ठिकाणी स्टॉल उपलब्ध करून देणे आणि त्या बचत गटानेच या स्वच्छतागृहाची देखभाल करणे, असा स्वरुपाचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे,  असे  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आ. चित्रा वाघ यांच्या प्रश्नावर सांगितले.

स्वच्छतागृहांची दर १५ दिवसांनी तपासणीपेट्रोल पंपांच्या ठिकाणी व महामार्गावरील हॉटेल्समध्ये असणाऱ्या स्वच्छतागृहांची महानगरपालिका, नगरपालिका अधिकाऱ्यांमार्फत दर पंधरा दिवसांनी तपासणी करण्याच्या सूचना देण्यात येतील. महानगरपालिका, नगरपालिका यांच्या हद्दीत स्वच्छतागृह उभारणे, त्यांची देखभाल करण्यासाठी संबंधित यंत्रणांना पालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून सूचना देण्यात येतील, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेChitra Waghचित्रा वाघ