शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्यातील १६० हेक्टरला तडाखा

By हरी मोकाशे | Published: April 13, 2024 6:47 PM

पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी सुरु

लातूर : गेल्या चार- पाच दिवसांपासून सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. त्याचा जिल्ह्यातील १६० हेक्टरवरील आंबा, द्राक्षे, केळीच्या बागांसह रबी ज्वारीस फटका असला आहे. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे.

गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक उन्हाळा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना केळी, द्राक्षे, आंब्याच्या फळबागा जोपासताना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या जलस्त्रोत कोरडे पडत आहेत तर विहिरींनी तळ गाळला आहे. शिवाय, कुपनलिका बंद पडत आहेत. त्यामुळे काही शेतकरी अन्य शेतकऱ्यांकडून विकत घेऊन पाणी बागा जगवित असल्याचे पहावयास मिळत आहे.

गेल्या चार- पाच दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे औसा, अहमदपूर, निलंगा, चाकूर, जळकोट, देवणी, रेणापूर, लातूरसह अन्य तालुक्यांतील फळबागांना फटका बसला आहे. काही ठिकाणीची काढणीस आलेली रबी ज्वारी भुईसपाट झाली आहे तर काही ठिकाणचा कडबा भिजला आहे.

भेटा येथे गारांचा पाऊस...शनिवारी सकाळी लातुरात १० मिनिटे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास औसा तालुक्यातील भेटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या शेतातील कडबा भिजला आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी...अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे गुरुवारी औसा तालुक्यातील नांदुर्गा व परिसरातील केळी, द्राक्ष, आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वादळी वाऱ्यामुळे फळझाडे उन्मळून पडली. या नुकसानीची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.टी. जाधव यांनी शनिवारी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेऊन नुकसानीनंतरच्या व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच फळपीकविमा योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी ए.के. पिनाटे, कृषी सहाय्यक एम.जी. वाघमारे, तलाठी गहिरवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

हलका ते मध्यम पावसाची शक्यता...शुक्रवारी रात्रीपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १६० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतली जात आहे. हवामान विभागाने तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर