शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड- लातूर जिल्ह्याच्या सीमेवर कडक नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ...

राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, काही जण रस्त्यावर फिरत असल्याने तसेच परजिल्ह्यात जात असल्याने शासनाने लॉकडाऊन करून प्रवासासाठी पुन्हा ई-पास अनिवार्य केले आहे. अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्य, जिल्ह्याअंतर्गत प्रवासासाठी ई- पास घ्यावा लागत आहे. त्यासाठी लातूर पोलीस विभागाकडून नागरिकांना आवाहनही करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील जांबपासून केवळ एक किमी अंतरावर लातूर जिल्ह्यातील शेवटचा तालुका जळकोट लागतो. लातूर जिल्ह्यात प्रवेश करताना राष्ट्रीय महामार्ग ५० वरील जांब-जळकोट या मार्गावर जांबपासून दीड किमी अंतरावर जळकोट पोलिसांनी चेक नाका उभारला आहे. तिथे लातूरमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी केली जात आहे. ई-पास नसलेल्यांना परत पाठविण्यात येत आहे.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सवलत देण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातून येणारे सर्व रस्तेही बंद करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने कंधारहून वाजरंवाडामार्गे जळकोट हा रस्ता असून, कुणकी पॉइंट येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तसेच नांदेड जिल्ह्यातील बान्हाळी- रावणकोळा मार्गे जळकोट हा रस्ता असून, श्री गुरुदत्त शाळेजवळ पोलीस बंदोबस्त आहे.

पोलीस बंदोबस्त तैनात...

जिल्ह्याच्या सीमेवर ई- पासद्वारे ये-जा करणाऱ्यांकडून कोरोनाचा संसर्ग होऊ नये. तसेच पासशिवाय कोणीही येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्यांकडील ई-पासची विशिष्ट अंतर ठेवून पाहणी करावी. पोलिसांनीही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना केल्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे म्हणाले.

राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाचे कर्मचारी, नगरपंचायतीचे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. यात प्रामुख्याने पोकॉ. एम.वाय. कासार, पोकॉ. के.टी. शिंदे, पोहेकॉ. माळवदे, पोकॉ. जायेभाये, गृहरक्षक दलाचे जवान आर.एन. दाचावार, एम.बी. तांबोळी, आर.बी. बेग, एस.एस. चव्हाण आदींचा समावेश आहे.