शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा चले जाव चळवळीत होता सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 13:01 IST

स्वातंत्र्य लढ्यात त्यांना दोन वेळा कारावास भोगावा लागला.

ठळक मुद्दे धार्मिक कार्यातून समाजाचा विकास घडवून आणण्याचे काम महाराजांनी केलेविविध उपक्रम राबवत सामाजिक व राष्ट्रीय सलोखा राखण्याचे कार्य

अहमदपूर (जि. लातूर) : चलेजाव चळवळीतील सहभागी राहिलेले १९४५ मध्ये एमबीबीएस पदवी मिळविणारे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची ओळख विज्ञाननिष्ठ संत अशी आहे. त्यांचे अनंतचतुर्दशीला लिंगैक्य झाल्यानंतर भक्तिस्थळ शोकसागरात बुडाले आहे. 

लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेले डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी सामाजिक, धार्मिक कार्यात सहभाग घेतला. १९३४ साली त्यांच्याकडे मडीवाळअप्पा मठाची सूत्रे हाती आली. वारद पाठशाळा, सोलापूर येथे त्यांचा अभ्यास झाला होता. वीरमठ संस्थानचे उत्तराधिकारी झाल्यानंतर पहिल्यांदा श्रावणमास तपोअनुष्ठान कपिलधार येथे झाला. गत आठवड्यातही त्यांनी तपोअनुष्ठान केले होते.

उर्दू, पारसी, कन्नड, पंजाबी, संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी आदी भाषा त्यांना अवगत होत्या़ त्यांनी संपादीत केलेला परमरहस्य ग्रंथ भक्तांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे़ त्यांनी लिंगायत समाजाच्या भजनाची पद्धती व कीर्तनकार परंपरा पुनर्जीवित केली. महाराजांनी संपूर्ण राज्यभर मन्मथ ज्योत रथयात्रा आयोजित केली होती. १९५५ पासून श्रीक्षेत्र कपिलधार पदयात्रेची सुरुवात केली. त्यांनी हिमालयात योगसाधनाही केली आहे. नुकताच त्यांचा जन्मशताब्दी सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाला होता. 

धार्मिक कार्यातून समाजविकास देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९४२ च्या चलेजाव आंदोलनातही त्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांना दोन वेळा कारावास भोगावा लागला. धार्मिक कार्यातून समाजाचा विकास घडवून आणण्याचे काम महाराजांनी केले़ महात्मा बसवेश्वर आणि संत शिरोमणी मन्मथ महाराजांच्या समतेच्या मार्गावर समाजाला घेऊन जाण्यासाठी त्यांनी अध्यात्माचा अवलंब केला़ अंधश्रद्धा, जातीद्वेष या गोष्टींना त्यांनी कधीच थारा दिला नाही़ व्यसनमुक्ती, आध्यात्मिक कार्य, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, वृक्षसंगोपन, सर्वधर्मीय विवाह सोहळा आदी उपक्रम त्यांनी राबविले़ सामाजिक व राष्ट्रीय सलोखा राखण्याचे काम त्यांनी केले़

टॅग्स :laturलातूरAdhyatmikआध्यात्मिक