केंद्रेवाडी ग्रामपंचायतीकडून एक घर, तीन वृक्ष उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST2021-09-23T04:22:20+5:302021-09-23T04:22:20+5:30

जि. प. सदस्य अशोक केंद्रे, पं. स. माजी सभापती आयोध्याताई केंद्रे व श्री साई गणेश मिलिट्री फाउंडेशनचे ...

One house, three tree activities from Kendrawadi Gram Panchayat | केंद्रेवाडी ग्रामपंचायतीकडून एक घर, तीन वृक्ष उपक्रम

केंद्रेवाडी ग्रामपंचायतीकडून एक घर, तीन वृक्ष उपक्रम

जि. प. सदस्य अशोक केंद्रे, पं. स. माजी सभापती आयोध्याताई केंद्रे व श्री साई गणेश मिलिट्री फाउंडेशनचे अनिरुद्ध केंद्रे, माधव केंद्रे, सदस्य इंद्रायणीबाई केंद्रे, पुष्पा केंद्रे, बाळू केंद्रे, भानुदास केंद्रे, तुकाराम केंद्रे यांनी अहमदपूर तालुक्यात ५२ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यातील पहिला टप्पा एक महिन्यापूर्वी केंद्रेवाडीमध्ये ३२०० वृक्ष लागवडीचा पूर्ण केला आहे. यात त्यांनी केंद्रेवाडीत एक घर तीन वृक्षांचे वाटप मंगळवारी करण्यात आले. यावेळी वासुदेव काळे, अशोक केंद्रे, मकरंद कोरडे, सुधाकर भोयर, अनिल केंद्रे यांच्या हस्ते हस्ते वृक्षांचे वाटप करण्यात आले. केंद्रेवाडी हे गाव ऑक्सिजन हब बनविण्याचा मानस अयोध्याताई केंद्रे व अशोक केंद्रे यांनी केला आहे.

Web Title: One house, three tree activities from Kendrawadi Gram Panchayat