सलग सहा दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:15 IST2021-04-29T04:15:08+5:302021-04-29T04:15:08+5:30

रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी ८३९ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. तर गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर ८८ रुग्ण आहेत. गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर ३३६ ...

More coronal free than affected for six consecutive days | सलग सहा दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

सलग सहा दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी ८३९ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. तर गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर ८८ रुग्ण आहेत. गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर ३३६ रुग्ण, १ हजार ८९५ रुग्ण मध्यम लक्षणाची परंतु ऑक्सिजनवर आहेत. तर ६४१ रुग्ण मध्यम लक्षणाची परंतु विनाऑक्सिजनवर आहेत. शिवाय, १० हजार १८४ रुग्ण सौम्य लक्षणाची आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली.

सहा दिवसांत १० हजार २११ कोरोनामुक्त

गेल्या पाच दिवसांमध्ये एकूण १० हजार २११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २३ एप्रिल रोजी १ हजार ७७५, २४ एप्रिलला १ हजार ७०४, २५ एप्रिलला १ हजार ६४४, २६ एप्रिलला १ हजार ७२५, २७ एप्रिलला १ हजार ६४३ आणि २८ एप्रिल रोजी १ हजार ७२० कोरोनामुक्त झाले.

Web Title: More coronal free than affected for six consecutive days