शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरचा मोठा निकाल! पहिल्या महापौर स्मिता खानापुरे पराभूत, भाजपच्या प्रेरणा होनराव विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:45 IST

काँग्रेसच्या पहिल्या महापौर प्रा. स्मिता खानापुरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला

लातूर: लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज माजी महापौरांच्या प्रतिष्ठेचा फैसला झाला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून झालेल्या पाच महापौरांपैकी चार जण यावेळेस रिंगणात होते. मात्र, मतदारांनी अनुभवापेक्षा रणनीती आणि नवीन समीकरणांना पसंती दिल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या पहिल्या महापौर प्रा. स्मिता खानापुरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून, भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांनी त्यांना धूळ चारली आहे.

माजी महापौरांचे नशीब काय सांगते? लातूरच्या राजकारणात 'पॉवरफुल' मानले जाणारे चारही माजी महापौर मूळचे काँग्रेसचेच. मात्र, या निवडणुकीत सर्वांच्या वाटा वेगळ्या होत्या.

विक्रांत गोजमगुंडे (विजयी): निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून राष्ट्रवादी (अजित पवार) गटात प्रवेश केलेल्या गोजमगुंडे यांनी प्रभाग ५ मधून ४,७२९ मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्या पक्षांतराच्या निर्णयावर मतदारांनी विजयाची मोहोर उमटवली आहे.

ॲड. दीपक सूळ (विजयी): काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या माजी महापौर दीपक सूळ यांनी प्रभाग १० मधून ५,४५१ मते घेत आपला दबदबा कायम राखला आहे.

प्रा. स्मिता खानापुरे (पराभूत): प्रभाग १५ मध्ये काँग्रेसकडून लढणाऱ्या स्मिता खानापुरे यांना भाजपच्या प्रेरणा होनराव (४,२४५ मते) यांनी पराभूत केले. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सुरेश पवार: प्रभाग ६ मधून शिंदेसेनेकडून नशीब आजमावत असलेल्या माजी महापौर सुरेश पवार यांच्या निकालाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

पक्षांतराची चुरस अन् काँग्रेसचे पारडे जड 
या निवडणुकीत माजी महापौर सुरेश पवार यांनी भाजप आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदेसेना गाठली होती, तर गोजमगुंडे यांनी 'हात' सोडून 'घड्याळ' बांधले होते. या राजकीय कोलांटउड्यांमध्ये गोजमगुंडे यशस्वी ठरले आहेत. शहरात एकूण १८ प्रभाग असून, ७० जागांसाठी लढत होत आहे. या निवडणुकीत एकूण ३५९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार काँग्रेस आणि वंचित आघाडीची युती ३३ जागांसह आघाडीवर आहे, तर भाजप १७ जागांवर तर राष्ट्रवादी ( अप) पक्ष एका जागेवर विजयी झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Election Upset: Former Mayor Khanapure Loses; Honrao Wins

Web Summary : Latur's election saw a major upset as former mayor Smitha Khanapure lost to BJP's Prerna Honrao. Other former mayors had mixed fates, with some winning after switching parties. Congress and allies lead with 33 seats.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६congressकाँग्रेसBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी