शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जळकोटातील वसतीगृहात कोविड हॉस्पिटल सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

जळकोट येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ...

जळकोट येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी उज्ज्वला शिंदे, डॉ. बिरादार, डॉ. कुंटे, सत्यकांत थोटे आदी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी मेंगशेट्टी म्हणाले, येथील कोविड सेंटरमध्ये नवीन १०० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. लवकरच या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशानुसार व मंजुरीनुसार दोन तज्ज्ञ डॉक्टर आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे जळकोटातील रुग्णांना अन्यत्र उपचारासाठी जाण्याची गरज नाही.

१ हजार १९० जणांची कोरोनावर मात...

सध्या जळकोट तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची नोंद १ हजार ४८७ अशी असून त्यातील १ हजार १९० जण उपचारानंतर ठणठणीत झाले आहेत. सध्या ॲक्टिव्ह रुग्ण २७१ आहे. कोरोनामुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे. २०७ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ३५ रुग्णांना उदगीर, लातूरला रेफर करण्यात आले आहे. जळकोटच्या कोविड केअर सेंटरमध्ये २७ उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. जगदीश सूर्यवंशी व डॉ. संजय पवार यांनी दिली.

सध्या जळकोट शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा आलेख कमी झाला आहे. मात्र, अशा कालावधीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.