कोविड केअर सेंटर निर्माण करण्यासाठी किनगावात पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:15 AM2021-04-29T04:15:11+5:302021-04-29T04:15:11+5:30

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही रुग्ण वाढली आहे. त्यामुळे किनगाव येथील लव्हराळे मंगल कार्यालयाची कोविड ...

Inspection in Kingao to build Covid Care Center | कोविड केअर सेंटर निर्माण करण्यासाठी किनगावात पाहणी

कोविड केअर सेंटर निर्माण करण्यासाठी किनगावात पाहणी

Next

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही रुग्ण वाढली आहे. त्यामुळे किनगाव येथील लव्हराळे मंगल कार्यालयाची कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी पाहणी करण्यात आली. आपत्कालिन परिस्थितीमध्ये या ठिकाणी कोविड सेंटर उभारता येईल का, याची पाहणी झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, मंडळ अधिकारी सोपान दहिफळे, तलाठी हंसराज जाधव, मल्लिकार्जुन लव्हराळे, अमोल लव्हराळे आदींची उपस्थिती होती.

कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत म्हणून पूर्वनियोजन म्हणून येथील मंगल कार्यालयाची पाहणी करण्यात आली आहे, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले. सध्या कोरोनाचे मोठे संकट आहे. अशा परिस्थितीत आपण समाजाचे काही देणे लागतो. कोविड रुग्णांसाठी शासनाने मंगल कार्यालय मागितले तर सामाजिक भावनाने ते उपलब्ध करुन देणार असल्याचे मल्लिकार्जुन लव्हाराळे यांनी सांगितले.

Web Title: Inspection in Kingao to build Covid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.