राजकुमार जाेंधळे / लातूर
अडीच लाखांचा साठा जप्त : रविवारी पहाटे २ वाजेपर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया
लातूर : रेणापूर पिंपळ फाटा येथील एका दुकानच्या गाळ्यात अनधिकृतरित्या एका कंपनीच्या रासायनिक खताचा साठा केल्याचे शनिवारी रात्री उघडकीस आले. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने २ लाख ५५ हजार १५० रुपयांचे खत ताब्यात घेतले असून, याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, रेणापूर पोलिस ठाण्यात रविवारी पहाटे २ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु हाेती.
खरीप हंगाम महिनाभरावर आला आहे. त्यामुळे रासायनिक खताचा अनाधिकृत साठा होऊ नये, तसेच बोगस खतांची विक्री होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या पथकाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, रेणापूर पिंपळ फाटा येथील एका दुकानच्या गाळ्यात अवैध विक्रीसाठी अनाधिकृतरित्या एका कंपनीच्या रासायनिक खताचे पोते ठेवण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय पथकाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी मिलिंद बीडबाग, सचिव तथा जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी संतोष लाळगे, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक अशोक तिडके, सी.आय. टिळक, प्रदीप राऊत यांनी शनिवारी सायंकाळी अचानक छापा मारला. यावेळी कृषी विकास अधिकारी दीपक सुपेकर उपस्थित होते. त्यावेळी २०:२०:० ह्या खताच्या १८९ बॅग आढळल्या. हा साठा अनाधिकृत केल्याचे निष्पन्न झाले. कृषी विभागाने हा साठा ताब्यात घेत गाळा सिल केला आहे. त्याचबराेबर तपासणीसाठी काही नमुने घेतले आहेत.
रासायनिक खताच्या १८९ बॅग...
रेणापूर पिंपळ फाटा येथील एका दुकानच्या गाळ्यात रासायनिक खताच्या १८९ बॅग आढळल्या. त्याची किंमत २ लाख ५५ हजार १५० रुपयावर आहे. याबाबत रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रविवारी पहाटे २ वाजेपर्यंत सुरु हाेती.
पकडलेला साठा केला सील...
गोपनीय माहितीच्या आधारे रेणापूर पिंपळ फाटा येथे छापा मारला. यावेळी कुठलाही परवाना नसताना रासायनिक खताचा साठा केल्याचे आढळले. हा साठा सिल केला असून? तपासणीसाठी नमुने घेतले आहेत. - मिलिंद बिडबाग, अध्यक्ष, जिल्हा भरारी पथक, लातूर
Web Summary : A raid in Renapur uncovered an illegal fertilizer stock worth ₹2.55 lakhs. Authorities seized the stock and sealed the premises. An investigation is underway after a complaint was filed with the Renapur police.
Web Summary : रेनापुर में एक छापे में ₹2.55 लाख मूल्य का अवैध उर्वरक भंडार उजागर हुआ। अधिकारियों ने स्टॉक जब्त कर परिसर को सील कर दिया। रेनापुर पुलिस में शिकायत दर्ज होने के बाद जांच जारी है।