रेणापूर (जि. लातूर) : प्रेमप्रकरणामुळे सतत येणाऱ्या धमक्या आणि मानसिक छळाला कंटाळून तालुक्यातील मोरवड येथील तेजस दिलीप घोडके (२५) या तरुणाने गळफास घेऊन शुक्रवारी रात्री आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे या घटनेमागील रहस्य उलगडले. याप्रकरणी रेणापूर पोलिसांत सात जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील मोरवड येथील तेजस दिलीप घोडके याचे गावात किराणा दुकान आहे. तो दुकान आणि शेती करीत असे. काही महिन्यांपूर्वी त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, ते पळून गेले होते. ती मुलगी अल्पवयीन असल्याने तेजसवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात झाला होता. त्यामुळे तो कारागृहात होता. त्याची नुकतीच जामिनावर सुटका झाल्याने तो पुन्हा गावात आला होता. दरम्यान, जामिनावर बाहेर आल्यानंतर तेजसला मुलीच्या नातेवाइकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत धमक्या येत होत्या. तू स्वतः मर, नाहीतर तुझ्या वडिलांना, भावाला आणि चुलत्याला मारून टाकू, अशा आशयाचे संदेश त्याला पाठवले जात होते. मानसिक त्रासामुळे तो प्रचंड तणावाखाली होता.
सुसाईड नोट लिहून संपवले जीवन...
शुक्रवारी रात्री ७:३० ते ८ वा. च्या सुमारास तेजसने मोरवड शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहिली आणि ती आपल्या चुलत भावाच्या व्हॉट्सॲपवर पाठवली. ‘मी माझ्या स्वतःच्या मर्जीने नाही, तर गावातील शिवाजी मोहिते, रोहन काळे, नागेश गंगणे, अशोक गंगणे, पवन मोहिते, किंचक घोडके, रंजना घोडके यांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करत आहे, असे चिठ्ठीत म्हटले आहे. याप्रकरणी मयत तेजसचे वडील दिलीप घोडके यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिसांत वरील सात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.
Web Summary : Tejas Ghodke, 25, from Morwad, ended his life due to constant threats and harassment from his girlfriend's relatives. A suicide note revealed the torment, leading to charges against seven individuals for abetment.
Web Summary : मोरवाड़ के 25 वर्षीय तेजस घोडके ने प्रेमिका के रिश्तेदारों द्वारा लगातार धमकियों और उत्पीड़न से तंग आकर आत्महत्या कर ली। एक सुसाइड नोट में उत्पीड़न का खुलासा हुआ, जिसके कारण सात लोगों पर मामला दर्ज किया गया।