सामाजिक संस्था घडविणे समाजाची संयुक्त जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST2021-09-23T04:22:29+5:302021-09-23T04:22:29+5:30

कलापंढरीच्या वतीने आयोजित आनंदोत्सव व संकल्प दिन कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, प्राचार्य डॉ. माधव ...

Creating social institutions is the joint responsibility of the society | सामाजिक संस्था घडविणे समाजाची संयुक्त जबाबदारी

सामाजिक संस्था घडविणे समाजाची संयुक्त जबाबदारी

कलापंढरीच्या वतीने आयोजित आनंदोत्सव व संकल्प दिन कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, प्राचार्य डॉ. माधव गादेकर, डी. एस. नरसिंगे, कुशावर्ता बेळ्ळे, प्रा. दत्तात्रय सुरवसे, नरसिंग घोडके, श्रीराम वाघमारे, सविता कुलकर्णी, ॲड. सुजाता माने, सुकेश भंडारे, विश्वनाथ तोडकर, प्रभाकर सायगावकर, बी. पी. सूर्यवंशी आणि डॉ. संजय गवई उपस्थित होते.

डॉ. नागोराव कुंभार म्हणाले, सामाजिक संस्थांनी नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांवर काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारले पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते घडल्यास समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल होईल आणि समाजात बदल पाहायला मिळेल. मुलांच्या आर्थिक आणि शैक्षणिक कार्यात सामाजिक संस्थांनी आपला सहभाग द्यावा. समाज शैक्षणिक आणि आर्थिक सक्षम होण्यासाठी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

यशस्वितेसाठी सूरज सूर्यवंशी, शिवदर्शन सदाकाळे, जयवंत जंगापल्ले, धनराज पवार, कुणाल जोशी, बाबासाहेब कांबळे, कीर्ती बणवस्कर, मधुकर गालफाडे, प्रतिमा कांबळे, अंजली कुलकर्णी, अक्षता सूर्यवंशी, अलका सन्मुखराव, सद्दाम शेख, बापू सूर्यवंशी, नादिर शेख, संजय पाटील, बालाजी सुरवसे, मारुती देवकते, अश्विनी मंदे, सुरेश हाके व संयम गवई यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Creating social institutions is the joint responsibility of the society