-राजकुमार जाेंधळे
लातूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ अखेर केलेल्या धडक कारवाईत १,६६८ आराेपींना अटक केली आहे. अवैध दारू, हातभट्टी, रसायन, गाेवा बनावटीचा दारूसाठा, गुन्ह्यात वापरलेली वाहने असा ३ काेटी २८ लाख ३ हजार ५५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वर्षभरात केलेल्या कारवाईत एकाही बेवारस गुन्ह्याची नाेंद नाही. वारस गुन्ह्यांची नाेंद करण्यात नांदेड परिक्षेत्रात नांदेड, परभणी, हिंगाेलीला मागे टाकत लातूर जिल्हा अव्वल ठरला आहे.
लातूर जिल्ह्यात २३ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या काळात माेठ्या प्रमाणावर धाडी टाकल्या. हातभट्टी अड्ड्यांना या कारवाईत लक्ष्य केले हाेते. शिवाय, चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्यांच्याही पाठलाग करून मुसक्या आवळल्या. अलीकडे माेठ्या प्रमाणावर गाेवा बनावटीची दारू पकडण्यात यश आले. वर्षभरात काेट्यवधींचा मुद्देमाल, वाहने जप्त केली आहेत. जुलै २०२५ मध्ये सर्वाधिक १६२ कारवाया केल्या असून, १६३ आराेपींना अटक केली. यामध्ये ११ लाख ४६ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे; तर सर्वांत कमी मे २०२५ मध्ये १२६ कारवाया केल्या. यात १२६ जणांना अटक केली असून, ६ लाख ११ हजार ९४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अशी झाली लातूर जिल्ह्यात वर्षभरात कारवाईमहिना गुन्हे वारस अटक मुद्देमाल जप्तएप्रिल १३३ १३३ २९२ २४७२६०५मे १२६ १२६ १२६ ६११९४४जून १२९ १२९ १२९ ८९११९०जुलै १६२ १६२ १६३ ११४६०३०ऑगस्ट १२४ १२४ १२६ १४४८७४०सप्टेंबर १३० १३० १४६ १६६०६४५ऑक्टाेबर १४१ १४१ १४३ २९०७९४०नाेव्हेंबर १५५ १५५ २१९ २७५७५५५डिसेंबर १५४ १५४ १५४ ५०४५५५०जाने. - २६ १३७ १३७ १४० ३६४८४९०फेब्रु. १४६ १४६ १४८ ५९४२३४०मार्च १३१ १३१ १३२ १७५०५३०एकूण १६६८ १६६८ १८४० ३०२८३५५९
गुन्ह्यांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेर केलेल्या कारवाईचा आकडा १,२८३ वर आहे. १ काेटी ६४ लाख ४ हजार १०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये केलेल्या कारवाईचा टक्का ३० टक्क्यांनी वाढला. यात ८३ टक्के मुद्देमाल अधिक जप्त केला.- केशव राऊत, अधीक्षक, लातूर