CoronaVirus : लातूर पोलिसांचा दणका; अधिकारी,पुढारी,पत्रकारासह २३ जणांवर गुन्हे नोंदवून वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 03:28 PM2020-04-01T15:28:16+5:302020-04-01T15:32:04+5:30

संचारबंदीत मॉर्निंग वॉकचा उत्साह अंगलट

CoronaVirus: Latur police's strict action; Officers, politician, journalists and 23 persons have been arrested in curfew | CoronaVirus : लातूर पोलिसांचा दणका; अधिकारी,पुढारी,पत्रकारासह २३ जणांवर गुन्हे नोंदवून वाहने जप्त

CoronaVirus : लातूर पोलिसांचा दणका; अधिकारी,पुढारी,पत्रकारासह २३ जणांवर गुन्हे नोंदवून वाहने जप्त

Next
ठळक मुद्दे15 एप्रिलपर्यंत कायद्याचे कठोर पालन करण्याचे पोलिसांचे आवाहनविनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई

लातूर: संचारबंदीचा आदेश लागू असताना मॉर्निंग वॉकला जाण्याचे प्रमाण अद्याप कायम आहे. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी एमआयडीसी, रिंग रोड, बार्शी रोडवर मॉर्निंग वॉकला गेलेल्या तेरा लोकांवर कारवाई केली. शिवाय, त्यांच्याकडील वाहने जप्त केले आहेत. सदर व्यक्तींवर एमआडीसी पोलीस ठाण्यात कलम १४४ नुसा कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये जिल्हा परिषदेच्या एका माजी समाजकल्याण सभापतीचा समावेश असून एक महसूल विभागात मंडळ अधिकारी पदावर कार्यरत आहे. तसेच या कारवाईत एका पत्रकाराचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नसला तरी प्रशासनाने या महाभयंकर आजार आजाराला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या आहेत. सामाजिक अंतर ठेवणे तसेच जीवनावश्यक वस्तूंची विक्री दोन वाजेपर्यंत करणे याबरोबरच अन्य योजना आहेत. या सर्व नियमांचे पालन शहरातील नागरिक करत आहेत. परंतु परंतु काही लोक नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही जणांवर ही कारवाई केली आहे. त्यांचे वाहने जप्त केली आहेत. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीच बाहेर पडावे. तेही निर्धारित वेळेतच. विनाकारण बाहेर येऊ नये आणि स्व:ताला धोक्यात घालू नये असे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे.
 
शहराच्या बार्शी रोड, एमआयडीसी परिसर, नांदेड नाका, औसा रोड परिसरात तसेच जुन्या जिल्हाधिकार कार्यालय आणि जिल्ह परिषदेच्या प्रांगणांत साडेपाच ते साडेसात या वेळेत फिरायला येणा-यांची संख्या असते. त्यांना रोखण्यासठी गुड मॉर्निंग पथक तैनात करण्यात आले आहे. रस्त्यावर वॉकिंग साठी आलेल्या नागरिकांवर या पथकामार्फत कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे १५ एप्रिल पर्यंत या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिका-यांनी दिला आहे.

Web Title: CoronaVirus: Latur police's strict action; Officers, politician, journalists and 23 persons have been arrested in curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.